Shootings in Brazil esakal
ग्लोबल

Shootings in Brazil : ब्राझीलच्या दोन शाळांमध्ये गोळीबार; शिक्षकांसह विद्यार्थ्याचा मृत्यू, 11 जण जखमी

प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांवर गोळीबार झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांवर गोळीबार झाला आहे.

ब्रासिलिया : आग्नेय ब्राझीलमधील (Brazil) दोन शाळांमध्ये (School) बुलेटप्रूफ जॅकेट घातलेल्या शूटरनं दोन शिक्षकांसह एका विद्यार्थ्याला गोळ्या घालून ठार केलं, तर 11 जण जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलीय.

राज्य सुरक्षा सचिवालयानं एका निवेदनात म्हटलंय की, प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांवर गोळीबार झाला आहे. या दोन्ही शाळा एस्पिरिटो सॅंटो (Espirito Santo) राज्यातील अराक्रूझ या छोट्या शहरात आहेत. अधिकाऱ्यांनी शूटरला पकडलं की नाही हे अद्याप स्पष्ट झालं नाही.

सचिवालयाच्या प्रेस कार्यालयानं जारी केलेल्या व्हिडिओमध्ये सुरक्षा सचिव मार्सिओ सेलेंटे म्हणाले, फुटेजमध्ये हल्लेखोरानं बुलेटप्रूफ जॅकेट परिधान केला असून हल्ल्यासाठी पिस्तूल वापरताना दिसत आहे. या हल्ल्यांत तिघांचा मृत्यू झालाय तर, 11 जण जखमी झाले आहेत. शूटरनं आपला चेहरा झाकून ठेवला होता, त्यामुळं त्याला ओळखणं कठीण होत आहे. त्याला इतरांनी मदत केली होती का, याचा तपास पोलीस करत आहेत. ब्राझीलमध्ये शालेय गोळीबार असामान्य आहे. परंतु, अलिकडच्या वर्षांत त्यात वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : मोनोरेल बंद, मेट्रोतही तांत्रिक बिघाड; घाटकोपर रेल्वे स्थानकावर उसळली प्रवाशांची गर्दी

'त्या घटनेनंतर मी खूप रडलो होतो' अभिनेता राजकुमार राव स्पष्टच बोलला, म्हणाला, 'आम्हाला काय भावना नाहीत का?'

Latest Maharashtra News Updates : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी सुरू, उज्ज्वल निकम कोर्टात हजर

Cyber Security : जगभरात चक्क १६ अब्ज पासवर्ड झाले लीक; भारत सरकारने दिला इशारा, तुमचं अकाऊंट सुरक्षित करा एका क्लिकवर..

Beed : कर्ज फेड नाहीतर पत्नीला माझ्या घरी सोड, सावकाराच्या जाचाने दुकानदाराची आत्महत्या; चिठ्ठीत लिहिलं, वर्गणी काढून क्रियाकर्म करा

SCROLL FOR NEXT