गोटाबाया राजपक्षे Sakal
ग्लोबल

श्रीलंकेचे राष्ट्रपती सिंगापूरात दाखल; उद्या सौदी अरेबियाला जाण्याची शक्यता

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी देशातील आर्थिक महामारी आणि जनतेच्या रोषामुळे देशातून पलायन केलं आहे.

दत्ता लवांडे

कोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (Shrilanka President Gotabaya Rajapaksha) यांनी देशातील आर्थिक महामारी आणि जनतेच्या रोषामुळे देशातून पलायन केलं आहे. देशातील आर्थिक महामारीमुळे तेथील नागरिकांनी राष्ट्रपती भवनावर हल्ला केला होता. राष्ट्रपती राजपक्षे यांनी श्रीलंकेतून पलायन करून मालदीव गाठल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर ते आता सिंगापूरला गेले आहेत. त्यानंतर आता ते सौदी अरेबियाला जाणार असल्याची माहिती आहे.

(Shrilanka President Gotabaya Rajapaksha Way To Singapore)

दरम्यान, राजपक्षे यांनी श्रीलंकेतून पलायन केल्यावर भारताने त्यांना पळून जाण्यास मदत केली असा आरोप श्रीलंकेने केला होता. त्यानंतर याची गंभीर दखल घेत भारतानं राजपक्षेंना अशी कोणतीही मदत केली नसल्याचं भारतीय उच्चायुक्तांनी स्पष्ट करण्यात आलं आहे. श्रीलंकन जनतेला भारताचा पूर्ण पाठिंबा असल्याचं भारताने सांगितलं आहे.

दरम्यान, गोटाबाया हे सौदी एअरलाईन्सच्या SV 788 या विमानाने मालदीवमधून सिंगापूरला गेले आहेत. तर त्यानंतर ते सिंगापूरहून सौदी अरेबियाला जाणार आहेत. त्यांच्या पलायनानंतर श्रीलंकेत सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2026 : लकी चार्म...! भारत टी-२० वर्ल्ड कप जिंकणार, कारण संघात 'तो' खेळाडू परतला; २०२४ चा वर्ल्ड कप जरा आठवा...

Nashik Municipal Election : नाशिकमध्ये सत्तेचे नवीन समीकरण! शहरात भाजपला, तर ग्रामीण भागात राष्ट्रवादीला झुकते माप

DMart : डीमार्टमध्ये कपड्यांचा सेल! विंटर डिस्काउंटमध्ये 299 पासून स्वेटर अन् थंडीतल्या वस्तु 92 रुपयांत, 'या' तारखेपासून ऑफर सुरू

Ishan Kishan : बहुत खुश हूं! वर्ल्ड कप संघात निवड झाल्यानंतर इशानची पहिली रिअ‍ॅक्शन; आगरकरनेही निवडीमागचं कारण सांगितलं

Sonia Gandhi on VB-G-RAM-G: ''सरकारने ‘मनरेगा’वर बुलडोझर फिरवला'' ; नाव बदलावरून सोनिया गांधींची जोरादार टीका!

SCROLL FOR NEXT