Vermont Gurdwara Sahib 
ग्लोबल

अमेरिकेतील गुरुद्वारावर आक्षेपार्ह लिखाण

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन - अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील गुरुद्वाराच्या भिंतीवर आक्षेपार्ह लिखाण करुन गुरुद्वाराचे विद्रुपीकरण घटना नुकतीच घडली.

लॉसएंजिलिस येथील व्हरमॉंड गुरुद्वारा येथे हा प्रकार आढळून आला. बॉलिवूड शीख मंदिर म्हणूनहा हा गुरुद्वारा ओळखला जातो. तेथील भिंतीवर आक्षेपार्ह मजकूर लिहून एक व्यक्ती कोणतेही स्पष्टीकरण न देता गुरुद्वाराच्या बाहेर पडली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली असल्याचे वृत्त "एनबीसी' लॉसएंजिलिस'ने दिले आहे. ""मी पोलिसांनी बोलावितो, असे म्हटल्यावर त्या व्यक्तीने आपला गळा कापण्याची धमकी दिली,'' अशी माहिती ही घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्या करण रे यांनी दिली. त्यांनी या घटनेचे मोबाईलमधून व्हिडिओ चित्रीकरण केले आहे. हॉलिवूड पोलिस याचा तपास करीत आहेत.

न्यूयॉर्कमध्ये राहणारे रे मित्राला भेटावयास आले असताना एक जण गुरुद्वाराच्या भिंतीवर घृणास्पद मजकूर लिहित असलेला दिसला. शीख समाजाची निंदा करणारे तीन मोठे उतारे त्याने लिहिले होते. त्यातील एका उताऱ्यात शीख समाजाला नामशेष करण्याची धमकीही दिली होती. दरम्यान, ज्याने हे कृत्य केले त्याला गुरुद्वारात बोलावून शीख समाजाविषयी माहिती देऊ, असे सराब गिल यांनी म्हटल्याचे वृत्तात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमिताभच्या ‘डॉन’चा दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड! चंद्र बरोट यांचं निधन, फुफ्फुसाच्या आजाराशी सात वर्षांची झुंज संपली!

Chandrashekhar Bawankule: कर्जमाफी समिती लागली कामाला; चंद्रशेखर बावनकुळे, बच्चू कडू यांनी आंदोलनाची घाई करू नये

Power Bank Overuse: पॉवर बॅकचा अतिवापर फोनसाठी घातक, वेळीच काळजी घ्या! अन्यथा फोनची बॅटरी...

Nagpur Accident: नागपुरात रस्ते अपघातांत सर्वाधिक मृत्यू दुचाकीचालकांमुळे; ६९ अपघातांत ७८ जणांचा मृत्यू

Girish Mahajan : गिरीश महाजन आणि माणिकराव कोकाटे यांच्यातील प्रशासकीय संघर्ष तीव्र

SCROLL FOR NEXT