ग्लोबल

Pakistan: हल्ले सुरूच! पेशावरमध्ये शीख डॉक्टरची गोळ्या झाडून हत्या

सकाळ डिजिटल टीम

पेशावर : पेशावर शहरात वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या शीख डॉक्टरची गुरुवारी सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी गोळी झाडून हत्या केली. डॉ. सतनाम सिंग (वय ४५) (खालसा) असे त्यांचे नाव असून गोळीबारानंतर हल्लेखोर फरार झाले. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणी स्वीकारली नाही. सिंग यांच्या पश्‍चात पत्नी, तीन मुली आणि दोन मुले आहेत.

पेशावर शहरातील शिख समुदायातील प्रसिद्ध सदस्य डॉ. सतनाम सिंग हे चरसद्दा रोडवर युनानी क्लिनिक चालवतात. काल सकाळी हल्लेखोर त्यांच्या केबिनमध्ये घुसले आणि त्यांच्यावर बेछुट गोळीबार केला. यात सिंग यांना चार गोळ्या लागल्या. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. जखमी सतनाम सिंग यांना लेडी रीडिंग हॉस्पिटल येथे नेण्यात आले. परंतु उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. हत्येचे कारण समजू शकले नाही. घटनेनंतर परिसर सील करण्यात आला. परंतु त्याचा उपयोग झाला नाही.

पेशावर हे पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांताची राजधानी असून त्याची सीमा अफगाणिस्तानशी लगत आहे. पेशावर शहरात तब्बल १५ हजार शीख राहतात. त्यातील बहुतांश व्यापारी असून काही जण फार्मसी चालवतात. ४५ वर्षीय सतनाम सिंग हे गेल्या दोन दशकांपासून पेशावर येथे युनानी दवाखाना चालवत होते. स्थानिक नेते हरपालसिंग यांनी हल्ल्याचा निषेध केला असून दोषींना पकडण्याची मागणी केली आहे. फाळणीनंतर हजारो शीख भारतात आले, परंतु असंख्य शीख पाकिस्तानातच थांबले. परंतु गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानात हिंदू शिख आणि ख्रिश्‍चन समुदायावर हल्ले होत आहेत. एवढेच नाही तर अहमदिया आणि शिया मुस्लिमांवरही हल्ले होत आहेत. खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री मोहंमद खान यांनी हल्ल्याचा निषेध केला आहे.

दरवर्षी होताहेत हल्ले

२०१८ मध्ये शिख समुदायाचे आघाडीचे नेते चरणजित सिंग यांची पेशावरमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली होती.२०२० मध्ये टिव्ही ॲकर रविंदर सिंग यांचीही हत्या करण्यात आली. २०१६ मध्ये तेहरिक इन्साफचे नेते सोरेन सिंग यांचीही हत्या केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठी 'खेळी'! ठाकरे गटातील खासदार शिंदेसेनेत येणार? एकनाथ शिंदेंची दिल्लीत गुप्त रणनीती

सुरज चव्हाण होणार बाबा? बायकोच्या 'त्या' पोस्टने वेधलं सगळ्यांचं लक्ष, Viral Video

120000000000! राजस्थान रॉयल्स फ्रँचायझी विकणे आहे; भारताची मोठी कंपनी तगडी रक्कम मोजून बनणार मालक, ४ स्पर्धक शर्यतीत

Latest Marathi News Live Update : पंढरपूर येथील सांगोला पेपर चोरी प्रकरण; दोन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Pune Rain: पुण्यात पावसाला सुरुवात! कोथरुड, बाणेर भागात ढगांचा गडगडाट; हवामान विभागाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT