ग्लोबल

खोट्या बातम्या पसरविणे आता पडणार महागात!

वृत्तसंस्था

सिंगापूर : अनेकदा आपण कोणतीही माहिती न घेता आलेली बातमी (फेक न्यूज) तशीच पसरवित (फॉरवर्ड) असतो. मात्र, आता अशी बातमी पसरविणे सिंगापूरमध्ये चांगलेच महागात पडणार आहे. यासाठी सिंगापुरात नवा कायदा तयार करण्यात आला असून, अशाप्रकारच्या खोट्या बातम्या पसरविणे गुन्हा ठरणार आहे.

खोट्या बातम्या (फेक न्यूज) पसरवित असताना अनेकदा राजकीय नेत्यांसह सामान्यांची बदनामी केली जाते. अशा खोट्या बातम्यांचे अनेक प्रकार समोर आले आहेत. मात्र, असे प्रकार रोखण्यासाठी भारतात कोणतीही ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. मात्र, सिंगापूरमध्ये याबाबत कडक पावले उचलण्यात आली आहेत. त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने पसरत असलेल्या खोट्या बातम्या रोखण्यासाठी नवा कायदा तयार करण्यात आलेला आहे. या कायद्यानुसार खोट्या बातम्या पसरवणे हा गुन्हा ठरणार आहे. याशिवाय या नव्या कायद्यानुसार सरकारला अशा बातम्या पोर्टलवरून हटवण्याचा अधिकारही देण्यात आला आहे. 

10 वर्षांचा होणार तुरुंगवास

सिंगापुरात कोणी ऑनलाइन फेक न्यूज दिल्यास त्याला दोषी ठरवण्यात येणार असून, संबंधिताला 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 3.77 कोटी रुपयांचा दंडही होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT