Chin-India 
ग्लोबल

सीमेवरील परिस्थिती स्थिर आणि नियंत्रणात

पीटीआय

बीजिंग - भारत-चीन सीमेवरील परिस्थिती स्थिर आणि नियंत्रणात असून चर्चेद्वारे वाद मिटविण्यासाठी दोन्ही देशांकडे परस्पर संमत मार्ग उपलब्ध आहेत, असे चीनने आज पुन्हा एकदा स्पष्ट केले. चिनी सैनिकांनी उत्तर सिक्कीममधील भारतीय भूमीत घुसखोरी केल्यामुळे गेल्या महिनाभरापासून तणाव निर्माण झाला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

भारत-चीनमधील सीमावाद मिटविण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थीची तयारी दर्शविली होती. भारताने याला नकार दिल्यानंतर चीननेही ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावून लावला होता. 

आम्ही भारताबरोबर चर्चा करून वाद सोडवण्यासाठी समर्थ असून तिसऱ्याच्या हस्तक्षेपाची गरज नसल्याचे चीनने स्पष्ट केले होते. अद्यापही दोन देशांमधील तणाव कमी झाला नसल्याच्या पार्श्वभूमीवर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लीजन यांनी आज याच भूमिकेचा पुनरुच्चार केला. सीमाप्रश्नी भारत आपल्या आत्मसन्मानाला धक्का बसू देणार नांगी, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. 

या विधानावर प्रतिक्रिया देताना लीजन म्हणाले की, चीनच्या भूमीचे संरक्षण करण्याबरोबरच सीमेवर शांतता राखण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. सध्या सीमेवरील परिस्थिती स्थिर आणि नियंत्रणात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कुणी गॅस देता का गॅस? मुंबईत ४-५ किमीपर्यंत रांगा, पुण्यात पहाटेपासून लोक रांगेत; काळ्याबाजारात एक किलोसाठी ५०० ते ७०० रुपये

Breaking: IPL 2026 चं वेळापत्रक बदलणार? RCB चे सामने एम चिन्नास्वामीवर होणार की नाही? आले मोठे अपडेट्स

चिंता वाढली! वॉकिंग स्टिकचा आधार घेत BCCI पुरस्कारांसाठी पोहचला टीम इंडियाचा खेळाडू; VIDEO

Latest Marathi Update : गोरेगावात चुलीवर शिजतेय गरीबांची शिव भोजन थाळी

Parner Crime : कीर्तनकाराचा मुलीवर अत्याचार; पारनेर तालुक्यातील प्रकार, आरोपीस पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT