terror attack viena.jpg 
ग्लोबल

ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे दहशतवादी हल्ला, 7 जण ठार

सकाळ वृत्तसेवा

व्हिएन्ना- फ्रान्समधील दहशतवादी हल्ल्याची घटना ताजी असतानाचा आता युरोपमध्ये आणखी एका देशावर असाच हल्ला झाला आहे. ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे झालेल्या गोळीबारात आतापर्यंत 7 जण ठार झाल्याचे वृत्त समजत आहे. या दहशतवादी हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. ऑस्ट्रियाच्या गृह मंत्रालयाने हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात एक हल्लेखोर ठार झाल्याचे सांगण्यात येते. 

ऑस्ट्रियाचे चान्सलर सेबेस्टियन कुर्ज यांनी हा अत्यंत घृणास्पद हल्ला असल्याचे म्हटले आहे. हल्लेखोरांनी विविध ठिकाणी अंधाधुंद गोळीबार केला. यात अनेकजण जखमी झाले आहेत. यामध्ये एका पोलिसाचाही समावेश आहे. व्हिएन्ना पोलिसांनी टि्वट करुन एका संशयित हल्लेखोराचा खात्मा केल्याचे सांगितले. 

ऑस्ट्रियाच्या गृहमंत्र्यांनी हल्लेखोरांविरोधात सुरक्षा दलाचे ऑपरेशन सुरु असल्याचे माध्यमांना सांगितले. व्हिएन्नाचे महापौर मायकल लुडविग यांच्या मते 15 जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सात जणांची प्रकृती गंभीर आहे. 

अनेक शस्त्रसज्ज हल्लेखोरांनी एकाचवेळी सहा वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला केल्याचे व्हिएन्ना पोलिसांनी सांगितले. पहिला गोळीबार स्थानिक वेळेनुसार सकाळी 8 वाजता झाला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT