ग्लोबल

जमावावर अंदाधुंद गोळीबार, सहा जणांचा मृत्यू

नामदेव कुंभार

इंग्लंडमध्ये जमावावर झालेल्या अंदाधुंद गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एक लहान मुलाचाही समावेश आहे. दक्षिण पश्चिम इंग्लंडमधील प्लायमाउथ शहरात काही अज्ञात लोकांनी जमावावर अचानक अंदाधुंद गोळीबार केला. यामुळेच गदारोळ माजला होता. यामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. रॉयटर्सने याबाबतचे वृत्त दिले आहे.

प्लायमाउथ शहरात जमावावर झालेली घटना धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया ब्रिटनच्या गृह सचिव प्रीति पटेल यांनी दिली आहे. प्रीति पटेल यांनी ट्विटरवर या घटनेबाबत आपली प्रतिक्रिया दिली. या हल्ल्यात मृत पावलेल्यांमध्ये दोन महिला, तीन पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. गोळी लागल्यामुळे उपचारासाठी एका महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

या घटनेचा दहशतवादी हल्ल्याशी कोणताही संबंध नसल्याचं प्लायमाउथ पोलिसांनी सांगितलं. प्लायमाउथ सटन आणि डेवोनपोर्टचे खासदार ल्यूक पोलार्ड म्हणाले की, ही घटना भयानक आणि धक्कादायक आहे. मृत्यू पावलेल्यांमध्ये लहान मुलाचा समावेश असल्याचं समजल्यानंतर दु:ख झालं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND A vs AUS A, 1st ODI: पाटीदार लढला, पण बाकी सारे ढेपाळले; भारताचा संघ १४९ वर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

SCROLL FOR NEXT