six year old-boy stabbed 26 times by US man linked to israel hamas war attack in US  
ग्लोबल

Israel Hamas War : सहा वर्षीय चिमुकल्यावर चाकूने २६ वेळा वार; इस्त्राइल-हमास युद्धातील हेटक्राईमच्या झळा अमेरिकेतही

इस्त्राइल-हमास युद्धादरम्यान जगभरात निदर्शने केली जात आहेत.

रोहित कणसे

इस्त्राइल-हमास युद्धादरम्यान जगभरात निदर्शने केली जात आहेत. अमेरिकेत देखील काही जण इस्त्राइल तर काही जण विरोधात रस्त्यावर उतरल्याचे पाहयाला मिळाले. यादरम्या एएपीने दिलेल्या एका वृत्तानुसार, अमेरिकेत एक मुस्लिम महिला आणि सहा वर्षीय मुलावर चाकूने अनेक वार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील एका घरमालकाने त्याच्या घरात राहणाऱ्या भाडेकरू महिली आणि मुलावर हा हल्ला केला आहे. दरम्यान त्या व्यक्तीवर हत्या आणि हेट क्राइमचा आरोप असून पोलिसांनी हे प्रकरण इस्त्राइल आणि हमास यांच्याशी संबंधीत असल्याचे म्हटले आहे.

या घटनेत सहा वर्षांच्या मुलावर चाकूने 26 वार करण्यात आले आहेत. विल काउंटी शेरीफ ऑफीसने दिलेल्या निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, ज्या मुलावर 26 वेळा वार झाले त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला असून 32 वर्षीय महिला जी त्या मुलाई आई असल्याचे मानले जात आहे ती बचावली जाण्याची शक्यता आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार या क्रूर हल्ल्यातील दोन्ही पीडित हे मुस्लिम असल्याने आणि हमास-इस्त्राइल यांच्यातील मीडल इस्टमधील संघर्षाच्या पार्श्वभूमिवर हा हल्ला करण्यात आला, अशी माहिती निवेदनात देण्यात आली आहे. ही घटना शिकागोपासून ६४ किलोमीटर पश्चिमेला झाली.

शेरीफ कार्यालयाकडून पीडितांच्या राष्ट्रीयतेबद्दल कुठलीही माहिती देण्यात आलेली नाहीये. मात्र काउंसिल ऑन अमेरिकन इस्लामिक रिलेशन्सच्या शिकागो कार्यालयाने मुलगा पॅलेस्टेनियन-अमेरिकन असल्याचे म्हटले आहे. अधिकाऱ्यांनी सांगकितले की, घरमालकाच्या हल्ल्याला विरोध करत महिलेने 911 क्रमांकावर कॉल केला. शेरीफ ऑफिसने हल्लेखोराचे नाव जोसेफ कजुबा असल्याचे सांगितले आहे.

शेरीफ कार्यालयाने सांगितले की, घराच्या आत, एका बेडरूममध्ये दोघे आढळून आले, दोन्ही पीडितांच्या छातीवर आणि वरच्या अंगावर चाकूच्या अनेक जखमा होत्या.तसेच शवविच्छेदनादरम्यान मुलाच्या पोटातून सात इंचाचा लष्करी स्टाइलचा चाकू काढण्यात आला. पोलिस आल्यावर त्यांना काझुबा याला घराकडे जाण्याऱ्या रस्त्याच्या कडेला जमिनीवर बसलेला आढळला. त्याच्या कपाळावर जखमा होत्या. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न आणि हेट क्राइम प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले. त्यापूर्वी त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले होते.

सीएआयआरच्या शिकागो कार्यालयाचे प्रमुख अहमद रेहब यांनी माध्यमांना महिलेने मृत मुलाच्या वडिलांना महिलेने पाठवलेल्या मेसेजचा हवाला देत सांगितले की, त्याने दरवाजा ठोठावला . आणि तिच्या गळा दाबण्याचा प्रयत्न केला, तुम्हा मुस्लिमांना मरावे लागेल, असेही तो बरळत होता. हा हल्ला आमच्यासाठी दुःस्वप्नापेक्षा कमी नाही असेही सीएआयआरने एका निवेदनात म्हटले आहे.

इस्त्राइलमध्ये काय सुरू आहे?

हमासने अचानक केलेल्या हल्ल्यात इस्राइलमध्ये सुमारे 1400 लोकांचा मृत्यू झाला. सुमारे 5000 रॉकेट डागल्यानंतर हमासचे सैनिक इस्राइलच्या हद्दीत घुसले. त्यांनी लोकांवर गोळीबार केला काही लोकांचे अपहरण करून त्यांना गाझा पट्टीत नेले. यानंतर, प्रत्युत्तर म्हणून, इस्रायलने गाझा पट्टीवर एकापाठोपाठ एक अनेक हवाई हल्ले केले, ज्यात किमान 2600 लोक मारले गेले आणि 5000 हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईच्या गजबजाटात हरवलेल्या दोन मुलींना शोधण्याची आईची धडपड, पोलिसांची रात्रंदिवस मेहनत

Mahashtra Farmers : अतिवृष्टीमुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, उत्पादनात घट

Pune : आंदोलन करण्यावरून राष्ट्रवादीच्या दोन गटात बाचाबाची; शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की

Uddhav Thackeray : सत्ताधाऱ्यांना माध्यमांनी प्रश्‍न विचारावेत, उद्धव ठाकरे यांची अपेक्षा; भाजपला सोडले की हिंदुत्व जाते का?

आजचे राशिभविष्य - 5 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT