ग्लोबल

अमेरिकेला बर्फाच्या वादळाचा तडाखा; अनेक ठिकाणी आणीबाणी

सकाळ डिजिटल टीम

बर्फाच्या वादळामुळे जवळपास ७ कोटी लोकांना अंधारात रहावं लागलं. तसंच वाहतूक व्यवस्थासुद्धा कोलमडून पडली आहे.

न्यूयॉर्क - अमेरिकेला शनिवारी बर्फाच्या वादळाचा मोठा दणका बसला. यामुळे अमेरिकेच्या पूर्वेकडील राज्यांमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. जवळपास ७ कोटी लोकांना अंधारात रहावं लागलं. तसंच वाहतूक व्यवस्थासुद्धा कोलमडून पडली आहे. राष्ट्रीय हवामान सेवा देणाऱ्या संस्थेनं नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. या बर्फाच्या वादळाचा सर्वाधिक प्रभाव हा न्यूयॉर्क आणि बोस्टन शहरांमध्ये दिसून आला.

अमेरिकेत शनिवारी बॉम्ब वादळाचा इशारा NWS ने दिला होता. या वादळामुळे काही भागात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी झाली आहे. तीन फुट थर साचेपर्यंत बर्फ पडला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांनी काळजी घ्यावं असं आवाहन केलं जातंय.

बॉम्ब वादळाने १ लाख १७ हजार घरांची वीज बंद झाली आहे. किनारपट्टीच्या भागात एक फुट इतका बर्फ पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. न्यूयॉर्क, न्यू जर्सी आणि बोस्टनमध्ये वादळामुळे आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. लोकांना घरात राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शनिवारी ३ हजार ५०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली.

फ्लोरिडाच्या दक्षिणेत NWS ने थंडीच्या लाटेचा इशारा दिला होता. वादळामुळे पूर्वेकडील समुद्र किनारपट्टीवरील गावे आणि शहरांमधील लोकांना विनंती केली की घरीच रहा आणि अनावश्यक प्रवास करू नका. मॅनहॅटनच्या उत्तरेला दहा इंच इतकी बर्फवृष्टी झाली. रेल्वेसेवा अंशत: बदं करण्यात आल्या होत्या. न्यूयॉर्क शहरातील रस्त्यावर बर्फाचे तुकडे पडले होते. न्यूयॉर्क आणि न्यू जर्सीत लोकांनी अनावश्यक प्रवास टाळावा असंही प्रशासनाने सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT