So sorry US envoy to India apologises over desecration of Mahatma Gandhi statue 
ग्लोबल

महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना; अमेरिकेने मागितली माफी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : अमेरिकेत महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. या प्रकरणी अमेरिकेनं माफी मागितली आहे. वॉशिंग्टन डीसीमध्ये असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची काही असामाजिक तत्त्वांकडून विटंबना करण्यात आली ही अतिशय दु:खद घटना आहे. आम्ही याबाबत खेद व्यक्त करतो. तसंच या प्रकरणी माफी मागतो, अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे भारतातील राजदुत केन जस्टर यांनी दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर अमेरिकेत सध्या सर्वत्र हिंसक आंदोलने सुरु आहेत. या हिंसाचारादरम्यान महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना घडली. वॉशिंग्टन डीसीमध्ये भारतीय दुतावासाबाहेर महात्मा गांधींचा पुतळा आहे.  युनायटेड स्टेटस पार्क पोलिसांनी या प्रकरणी तपास करत असून यावर अमेरिकेकडून माफी मागण्यात आली आहे.

काय आहे मूळ प्रकरण?
जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय नागरिकाने २० डॉलरची एक बनावट नोट एका दुकानात चालविण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती. जॉर्जला त्याच्या कारमधून उतरायला सांगितल्यानंतर त्याने पोलिसांशी हुज्जत घातली व झटापटही केली होती असे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर, जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांच्या कोठडीत मृत्यू झाल्याने देशभर जनक्षोभाची मोठी लाट निर्माण झाली.
------------
कलेक्टरनं ऑफिसमध्येच केला बलात्कार; महिलेचा गंभीर आरोप
------------
भारताच्या संरक्षण सचिवांना कोरोनाची लागण
------------
अमेरिकेतील विविध राज्यांत लोकांनी उत्स्फुर्तपणे रस्त्यांवर उतरून आंदोलन केले. मिनियापोलिस शहरामध्येही आंदोलकांनी आज संचारबंदी धुडकावून लावत सरकार आणि यंत्रणेविरोधात निदर्शने केली. या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लष्करी पोलीस तुकड्यांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. अन्य शहरांमध्ये देखील हे आंदोलनाचे लोण पसरल्याने यंत्रणा सावध झाली आहे. दरम्यान, फ्लॉइड यांची मान दोन्ही गुडघ्यांच्या खाली दाबून धरणाऱ्या श्वेतवर्णीय डेरेक शोविन या पोलिस अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा ठपका ठेवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Noida Tourism: मोदींनी एअरपोर्ट सुरू करताच तरुणाई सुसाट! विकेंडला फिरायला 'या' ४ ठिकाणांना मिळतेय पहिली पसंती

Hanuman Jayanti 2026: यंदा हनुमान जयंती 1 की 2 एप्रिलला? जाणून घ्या तारीख, वेळ, शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजाविधी

US-Iran Conflict : "नरकात तुमचं स्वागत, सैन्य पाठवाल तर बनेल कब्रस्तान; इराणचा अमेरिकेला थेट इशारा

Vardha News: भीषण अपघातात एक ठार, दोघे जखमी; कोसुर्ला शिवारातील घटना : ट्रिपल सीट बाईकला टिप्परने कट मारल्याने अपघात

Yavatmal News:१० हजार रस्ते बांधकामाचे नियोजन; आढावा बैठक; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेची अंमलबजावणी

SCROLL FOR NEXT