ग्लोबल

भारतीय इंजिनीअरची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या, एकतर्फी प्रेमातून झाला गोळीबार

सकाळन्यूजनेटवर्क

भारताच्या 32 वर्षीय सॉफ्टवेयर इंजिनीअरची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्या तरुणाचं नाव शरीफ रहमान असं असून गेल्या बुधवारी ही घटन घडली आहे. शरीफ रहमान भोपाळमधील राहणारा आहे. स्थानक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार शरीफच्या एका मैत्रणीसोबत आरोपी एकतर्फी प्रेम करत होता. अमेरिकेतील काही मीडियानं या एकतर्फी प्रेमातून होत असलेल्या गन्ह्याबाबात चिंता व्यक्त केली आहे. शरीफच्या कुटुंबानं मीडिया रिपोर्ट्सवर चिंता व्यक्त केली आहे.  

शरीफ रहमान यांचा मोठा भाऊ मुकीम यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलेय की, लहान भाऊ शरीफ याची सेंट लुइस येथे गोळ्या मारुन हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाली. याबाबतच्या माहितीसाठ यूनिवर्सिटी सिटी पोलिसांसोबत संपर्क साधला.  मात्र, पोलिसांनी एसओपीचा कारण सांगत काहीही माहिती देण्यास नकार दिला. त्यासोबतच शरीफ यांच्या मित्रांनीही काहीही माहिती देण्यास नकार दिलाय.  

सॉफ्टवेअर इंजीनिअर शरीफ रहमान यांची आई आणि भाऊ भोपाळमधील सुभाष नगर परिसरात राहतात. दोन्ही देशातील कोरोनाची परिस्थिती पाहून शरीफ याच्यावर अमेरिकेतच अंतिम संस्कार करण्याचा निर्णय घेतलाय. शिकागो येथील भारतीय दूतावासानं सर्व मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. शरीफ काम करत असलेल्या कंपनीच्या एचआरसोबत भारतीय दूतावासानं संपर्क केला असून मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.  

गेल्या बुधवारी सॉफ्टवेअर इंजीनिअर शरीफ रहमान याच्यावर गोळीबार झाला होता. यूनिवर्सिटी सिटी अपार्टमेंटमध्ये तो जखमी अवस्थेत आढळला होता. रहमान याची मैत्रीण याच अपार्टमेंटमध्ये राहत होती. शरीफ याला जखमी अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान शरीफ याचा मृत्यू झाला. यूनिवर्सिटी सिटी पोलिसांनी या घटनेतील संदिग्ध आरोपी कोल जे मिलर याला ताब्यात घेतलं असून खूनाचा गुन्हा दाखल केला.  स्थानिक प्रासरमाध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार, कोल जे मिलर शरीफच्या मैत्रीणीसोबत एकतर्फी प्रेम करत होता. गोळीबार करण्यापूर्वी कोल जे मिलर यानं काही जणांसोबत याबाबत चर्चा केली होती. कोल जे मिलर याचा स्मार्टफोनही जप्त करण्यात आला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : वारजेत एका व्यक्तीकडून जिवंत काडतुसे आणि पिस्तुल जप्त

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT