somalia esakal
ग्लोबल

VIDEO: जागतिक स्पर्धेत महिला खेळाडूचा लज्जास्पद रिकॉर्ड; देशाने मागितली माफी

चीनमध्ये जागतिक विद्यापीठ खेळांचे आयोजन केले जात आहे. या खेळामध्ये सोमालिया देशाच्या एका महिला खेळाडूने नकोसा विक्रम केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Somali Sports Athlete

नवी दिल्ली- चीनमध्ये जागतिक विद्यापीठ खेळांचे आयोजन केले जात आहे. या खेळामध्ये सोमालिया देशाच्या एका महिला खेळाडूने नकोसा विक्रम केला आहे. विशेष म्हणजे या मुद्द्यावरुन सोमालिया देशाला जाहीररित्या माफी मागावी लागलीय. याशिवाय सोमालिया देशाच्या नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना काढून टाकण्याची मागणी केली आहे. चीनमध्ये 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या काळात जागतिक विद्यापीठ खेळांचे आयोजन केलंय.

स्पर्धेसाठी सोमालियाने 100 मीटर रेससाठी नसरा अबुबकर अली नावाच्या महिलेला मैदानात उतरवलं होतं. या स्पर्धकाने विजेता उमेदवारापेक्षा दुप्पट वेळ घेतला. या घटनेनंतर सोमालियाचे क्रिडा मंत्री मोहम्मद बर्रे मोहमूद यांना नसरा अबुबकर अली हिला स्पर्धेत उतरवल्याप्रकरणी जाहीर माफी मागावी लागली. माहितीनुसार, नसरा अबुबकर अली या महिलेला कोणत्याही उच्च स्तरीय खेळांच्या सामन्यात खेळल्याचा अनुभव नाही.

नसरा अबुबकर अली इतर स्पर्धकांपेक्षा खूपच मागे राहिल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय. शेवटी ती हसत हसतच रेस पूर्ण करते. नसराने 21.81 सेंकदात ही स्पर्धा पूर्ण केली, विजेता उमेदवारापेक्षा 10 सेकंद तिने जास्त वेळ घेतला. सोमालियाच्या क्रिडा मंत्र्यानी या घटनेला लाजीरवाणे म्हटलं आहे. ते म्हणाले की, चीनमध्ये जे झालं ते सोमालियाचं प्रतिनिधित्व करत नाही. मी तमाम सोमालिया जनतेची माफी मागतो.

रिपोर्टनुसार, 'द सोमाली एथलीट फेडरेशन'ची अध्यक्ष खादिज अदेन दाहिर यांना निलंबित करण्यात आलं आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोमालिया जनतेने नाराजी व्यक्त केली आहे. जागतिक स्पर्धेमध्ये अशाप्रकारची कामगिरी पाहायला मिळणे, अत्यंत लज्जास्पद आहे. खेळाडू देशाचं प्रतिनिधित्व करत असतात. त्यामुळे देशाची मान शरमेनं खाली जाते. अशा खेळाडूंची निवड कोण करतं? सर्वकाही चीड आणणारं आहे, अशी भावना सोमालिया जनतेने सोशल मीडियावरुन व्यक्त केली आहे.

सोमालिया सरकारने याप्रकरणावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. देशाने या स्पर्धेसाठी कोणाचीही निवड केलेली नाही. त्यामुळे स्पर्धक तेथे कशी पोहोचली. कोणत्या आधारावर खेळाडूची निवड करण्यात आली, याची चौकशी केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deepali Sayyad Claims : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’वरून खळबळ! दिपाली सय्यदला धमक्या, “ते नाव घेतलं तर सर्व काही संपेल...”

Petrol-Diesel Price: तेल कंपन्यांना रोज 550 कोटींचा तोटा! सरकारच्या दाव्यानंतर पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर

Marital Dispute: पत्नीच्या प्रेमसंबंधातून धर्मांतराचा कट? पत्नीच्या वागण्यात बदल झाल्याचा पतीचा दावा, मुंबईतील बँकेकडे मोठी मागणी

Panhala Accident News : नातीचा चेहरा पाहून परतणाऱ्या आजीवर काळाचा घाला, पन्हाळ्यातील घटनेने हळहळ

SRH vs RR, Eliminator: "नेट्समध्ये वैभवला मी...", जोफ्रा आर्चरचे १५ वर्षांच्या सूर्यवंशीला आऊट करण्याबद्दल भन्नाट उत्तर; VIDEO

SCROLL FOR NEXT