G20 Summit 
ग्लोबल

G20 Summit : स्पेनच्या राष्ट्राध्यक्ष कोरोना पॉझिटिव्ह; दिल्लीतील G-20 परिषदेत होणार नाही सहभागी

रवींद्र देशमुख

New Delhi - दिल्लीत होणाऱ्या G20 बैठकीवर कोरोनाचे सावट पसरले आहे. अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बिडेन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता स्पेनचे राष्ट्राध्यक्ष पेड्रो सांचेझ हे कोविड पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे.

सांचेझ हे G20 परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात येणार होते, परंतु आता त्यांच्या जागी स्पेनचे उपराष्ट्रपती आणि परराष्ट्र मंत्री येणार आहेत.

ट्विटरवर माहिती देताना सांचेझ म्हणाले की, सध्या मला बरं वाटत आहे. आज दुपारी माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी G20 शिखर परिषदेसाठी नवी दिल्लीला येऊ शकणार नाही. ते म्हणाले की G20 शिखर परिषदेत स्पेनचे प्रथम उपाध्यक्ष नादिया कॅल्विनो सांतामारिया आणि परराष्ट्र मंत्री जोस मॅन्युएल अल्बेरेस हे प्रतिनिधित्व करतील.

याआधी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही शिखर परिषदेतून माघार घेतली आहे. त्यांच्याऐवजी चीन आणि रशियाचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष अल्बर्टो फर्नांडिस G-20 बैठकीत सहभागी होण्यासाठी दिल्लीत पोहोचले आहेत. दरम्यान, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन दिल्लीला रवाना झाले आहेत. बिडेन संध्याकाळी 6.55 वाजता दिल्लीला पोहोचतील.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Action: डॉमिनोजनंतर तुकाराम मुंढेंचा झेप्टो, इन्स्टामार्टसह फ्रुटीवर प्रहार; ११ तास छापेमारी, १४ परवाने निलंबित

BSNL ग्राहकांना स्वातंत्र्य दिनाची 'डिजिटल भेट', एक रुपयात मोबाइल सेवा; २५ हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्म

PM Modi Mental Naxalism Statement : 'नक्षलवादाने तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केले'; मानसिक नक्षलवादाला ठेचल्याशिवाय भारत विकसित होणार नाही, पीएम मोदींचा जोरदार हल्ला

Independence Day Live Update : पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण, चंद्रकांत खैरेंचा कानमंत्र; दानवेंची गळाभेट चर्चेत

D.B. Dhamanaskar: ज्येष्ठ कवी द. भा. धामणस्कर यांचे निधन

SCROLL FOR NEXT