ग्लोबल

श्रीलंका चिनी मुत्सद्देगिरीचा बळी ठरला; सीआयए प्रमुखांचा दावा

श्रीलंकेला चीनचा डाव समजू शकला नाही असे म्हणत त्यांनी इतर देशांनी यातून धडा घेतला पाहिजे असे आवाहन केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएचे प्रमुख बिल बर्न्स यांनी कर्जाच्या सापळ्यात अडकलेल्या श्रीलंकेच्या सध्याच्या आर्थिक दुर्दशेसाठी चिनी मुत्सद्देगिरीला जबाबदार धरले आहे. श्रीलंकेला चीनचा डाव समजू शकला नाही असे म्हणत त्यांनी इतर देशांनी यातून धडा घेतला पाहिजे असे आवाहन केले आहे.

वॉशिंग्टनमधील अस्पेन सिक्युरिटी फोरमला संबोधित करताना सीआयएचे प्रमुख बर्न्स म्हणाले की, श्रीलंकेची चूक इतर देशांनी इशारा म्हणून घेतली पाहिजे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) सोबतच्या चर्चेत अभूतपूर्व आर्थिक संकटावर तोडगा काढण्यात श्रीलंका अयशस्वी ठरला आणि चीनच्या जाळ्यात सापडला, असे सीआयए प्रमुख म्हणाले.

बर्न्स म्हणाले की, चिनी कंपन्या इतर देशांमध्ये मोठी गुंतवणूक करू शकतात, त्यासाठी त्या आकर्षक ऑफर देतात. मात्र, आज श्रीलंकेसारख्या देशांची स्थिती पाहणे आवश्यक आहे. कारण त्यांच्यावर चीनच्या प्रचंड कर्जाचा दबाव असल्याचे म्हटले आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता जगभरातील देशांना चीनसोबत कोणताही करार करण्यापूर्वी डोळे उघडे ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT