sri lanka private schools closed f 
ग्लोबल

श्रीलंका : आठवडाभर शाळा बंद, नागरिकांसह विद्यार्थ्यांवर आर्थिक संकटाचा परिणाम

आता देशात वीज टंचाईच्या पार्श्वभूमीवर आजपासून आठवडाभर सर्व शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

आता देशात वीज टंचाईच्या पार्श्वभूमीवर आजपासून आठवडाभर सर्व शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.

श्रीलंकेत (Sri-lanka News) गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. खाण्या-पिण्याच्या वस्तूंपासून पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. सध्या श्रीलंकेतील नागरिकांसाठी पुरेसं इंधन उपलब्ध नाही. दरम्यान, आता देशात वीज टंचाईच्या पार्श्वभूमीवर आजपासून आठवडाभर सर्व शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.

श्रीलंकन नागरिक सध्या भीषण वीज संकटाचा सामना करत आहेत. पुरेसा वीजपुरवठा नसल्यामुळे नागरिकांना लोडशेडींगला सामोरं जावं लागत आहे. इंधन संकटामुळे श्रीलंकेनं 04 जुलैपासून शाळा एका आठवड्यासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, सरकारी आणि राज्य-मान्यताप्राप्त खाजगी शाळा आठवडाभर बंद राहतील, अशी माहिती शिक्षण विभागानं दिली आहे.

श्रीलंकेच्या मंत्र्यांनी सांगितलं, 'शाळा बंद असल्याच्या कालावधीतील अभ्यासक्रमाचा समावेश पुढील अभ्यासक्रमात करण्यात येईल. गेल्या महिन्यातही इंधनाअभावी ग्रामीण भागातील शाळा एक दिवसासाठी बंद ठेवण्यात आल्या होत्या. तर गेल्या दोन आठवड्यांपासून देशभरातील शहरी भागात शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत

दरम्यान, देशाच्या शिक्षण मंत्रालयाचे सचिव निहाल रणसिंघे यांनी शाळांना ऑनलाइन वर्ग घेण्यास सांगितलं आहे. दरम्यान, विभागीय स्तरावर शाळांना कमी विद्यार्थ्यांसह वर्ग चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे, जेणेकरून वाहतुकीच्या अडचणींचा विद्यार्थी, शिक्षक आणि मुख्याध्यापकांवर परिणाम होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Dhabi Visa: भारतीय पर्यटकांसाठी खुशखबर! अबू धाबीचा UAE व्हिसा मोफत मिळणार, अटी काय अन् कुणाला फायदा होणार?

India Unemployment Rate: तरुणांसाठी नोकरीची चिंता कायम! देशातील बेरोजगारीची स्थिती ‘जैसे थे’; दर ५.५ टक्क्यांवर स्थिर

विद्यार्थ्यांनो, तुमच्या हातात बदलाची ताकद! गावाची समस्या जगासमोर मांडा; साम टीव्ही देतंय ‘Next Gen Reporter’चं व्यासपीठ

Pune Grand Tour : पुणे ग्रँड टूरसाठी ४१३ किमीचे नवीन रस्ते; ६२७ कोटींचा खर्च

Nutritious Diet : पोषण आहाराअभावी विद्यार्थ्यांची ताटे रिकामीच! कुठे तेल आहे तर तांदूळ नाही, हळद आहे तर जिरे-मोहरी नाही

SCROLL FOR NEXT