Sri Lanka Prime Minister Mahinda Rajapaksa  Sakal
ग्लोबल

श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे राजीनामा देण्याची शक्यता

श्रीलंकेत काल मध्यरात्रीपासून श्रीलंकेत पुन्हा एकदा आणिबाणी घोषित करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

कोलंबो : श्रीलंकेतील दिवसेंदिवस ढासाळत चाललेल्या आर्थिक परिस्थितीमुळे काल मध्यरात्रीपासून श्रीलंकेत पुन्हा एकदा आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. दरम्यान देशात गंभीर होत चाललेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या विनंतीनंतर पदाचा राजीनामा देण्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजत आहे. राजपक्षे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष मंत्रिमंडळ बैठकीत, महिंदा राजपक्षे यांनी श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्यास सहमती दर्शवली आहे. महिंदा राजपक्षे सोमवारी एका विशेष निवेदनात त्यांच्या पदाचा राजीनामा देणार असून, पुढील आठवड्यात मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याचे आहेत, असे वृत्त कोलंबो पेजने दिले आहे. (Sri Lankan Prime Minister Mahinda Rajapaksa Likely To Resign)

दरम्यान, श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी मान्य केले होते की, लोकांच्या तीव्र निषेधादरम्यान देशातील आर्थिक आणि राजकीय संकटाचे व्यवस्थापन करणे एक गंभीर समस्या बनली आहे, असे कोलंबो पेजने वृत्त दिले आहे. श्रीलंकेचे कॅबिनेट मंत्री, प्रसन्ना रणतुंगा, नालाका गोदाहेवा आणि रमेश पाथिराना या सर्वांनी महिंदा राजपक्षे यांच्या देशाच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयाला सहमती दर्शविली आहे. तर दुसरीकडे मंत्री विमलवीरा दिसानायके यांनी महिंदा यांचा राजीनामा देशाच्या संकटाचा सामना करण्यासाठी व्यर्थ ठरेल असे मत व्यक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी! ठाण्यातील 'हा' ब्रिज बंद राहणार; किती महिने अन् का?

राजस्थान रॉयल्समध्ये असतानाच Ravindra Jadeja ला मिळालेलं 'रॉकस्टार' नाव, शेन वॉर्नने ओळखलं टॅलेंट अन्...; जाणून घ्या संपूर्ण कहाणी

Balewadi News : राडारोड्याने हाय स्ट्रीटजवळील पदपथ बंद; बालेवाडीत दीड महिन्यापासून सिमेंटचे गट्टू बसविण्याचे काम, उपाययोजनांची मागणी

पेढ्यातून गुंगीचं औषध देत अत्याचार, ब्लॅकमेल करत २ वर्षे संबंध ठेवले अन् ५९ लाख उकळले, मुख्याध्यापकाला अटक

RBI: निर्यातदारांसाठी सवलती! आयात शुल्काचा परिणाम कमी करण्यासाठी ‘आरबीआय’ची उपाययोजना

SCROLL FOR NEXT