Pm-Modi-Petrol-Diesel-Hike 
ग्लोबल

'या' देशाने पेट्रोलसाठी भारताकडे मागितले 500 दशलक्ष डॉलर्स

ओमकार वाबळे

श्रीलंका सरकारने परकीय चलनाच्या संकटात इंधन पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी भारताकडून 500 दशलक्ष डॉलर्सचं कर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हा प्रस्ताव अर्थ खात्यातकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. यानंतर तो मंत्रिमंडळाकडे सादर केला जाईल, अशी माहिती श्रीलंकेचे ऊर्जा मंत्री उदय गमनपिला यांनी दिली आहे. कर्जाचा प्रस्ताव मंजुरीसाठी वित्त विभागाकडे पाठवला असून मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर त्यावर निर्णय होईल, असे ते म्हणाले.

कॅबिनेटने ओमानकडून इंधन खरेदीसाठी 3.6 अब्ज डॉलर्सचे कर्ज आधीच मंजूर केले आहे. पुढील वर्षी जानेवारीपर्यंत सतत इंधन पुरवठ्याची हमी दिली जाऊ शकते. श्रीलंकेला सध्या परकीय चलन संकट आणि वाढलेल्या जागतिक किंमतींचा सामना करावा लागत आहे. देशातील इंधन महामंडळाकडून किरकोळ किंमती वाढवल्या जाण्याच्या बातमीमुळे गुरुवारपासून पेट्रोल पंपांवर लांबच सांब रांगा लागल्या होत्या, गमनपिला म्हणाले.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय चलन खरेदी करण्यात श्रीलंकेला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय. मागील वर्षाच्या तुलनेत पहिल्या सहा महिन्यांमध्ये श्रीलंकेतील तेलाची किंमत 41 टक्क्यांहून जास्त झाली आहे. हा आकडा दोन अब्ज डॉलर्सवर गेलाय. त्यातच कोरोनामुळे श्रीलंकेच्या तिजोरीवर ताण आला आहे.

सप्टेंबरमध्ये श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी देशात आर्थिक आणीबाणी जाहीर केली होती. सतत वाढणाऱ्या महागाईमुळे त्यांनी हे पाऊल उचलले. देशाच्या चलनाच्या किंमतीत मोठी घसरण झाली, ज्यामुळे खाद्यपदार्थांचे भाव देखील गगनाला भिडत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Warren Buffett: वॉरेन बफेंसारखी गुंतवणूक करायला शिका; कमवाल करोडो रुपये, काय आहे त्यांची स्ट्रॅटेजी?

HBD MS Dhoni: एमएस धोनीच्या नावावर असलेले असे ५ रेकॉर्ड जे मोडणं कोणालाही आहे महाकठीण

Chandrakant Patil: पुणे पोलिस दलात लवकरच एक हजार जणांना घेणार; चंद्रकांत पाटील यांची माहिती

11th Class Admission: अकरावीच्या प्रवेशासाठी आज अखेरची संधी; ३२ हजार विद्यार्थ्यांनी निश्चित केला प्रवेश

Solapur News: 'मुख्यमंत्र्यांसमवेत कल्याणशेट्टी अन्‌ मानेंची चर्चा'; माजी खासदार थांबले काही अंतरावर, नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT