Kanchana Wijesekera Sakal
ग्लोबल

श्रीलंकेकडून आभार; भारत हा एकमेव देश आहे ज्याने...

श्रीलंकेतील आर्थिक संकटामुळे आणिबाणी लागू करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

कोलंबो : श्रीलंका आर्थिक संकटात सापडल्यामुळे तेथे आणिबाणी लागू करण्यात आली आहे. त्यानंतर आता श्रीलंका या संकटातून सावरण्याचा प्रयत्न करत असून इंधनासाठी श्रीलंकेने अनेक देशांना मदत मागितली होती पण फक्त भारताने त्यांना मदत केल्यामुळे लंकेतील उर्जामंत्र्यांनी भारताचे आभार मानले आहेत.

(SriLanka Crisis)

श्रीलंकेचे ऊर्जामंत्री कांचना विजेसेकेरा यांनी शनिवारी सांगितले की, श्रीलंका सरकारने अनेक देशांना इंधनासाठी मदतीचे अवाहन केले होते कारण श्रीलंका सध्या राजकीय अशांतता आणि आर्थिक संकटामुळे अडचणीत आहे. "भारत हा एकमेव देश आहे ज्याने आतापर्यंत श्रीलंकेला इंधनासारख्या अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी क्रेडिट लाइन दिली आहे." असं म्हणत त्यांनी भारताचे आभार मानले आहे.

दरम्यान, जगातील सर्वांत मोठा इंधन उत्पादक आणि निर्यातदार देश असलेल्या रशियाकडे सुद्धा आम्ही मदतीसाठी मागणी केली आहे. आमच्या गरजा आम्ही त्यांना सांगितल्या असून त्यांनीही मदतीचे आश्वासन दिले आहे. त्यांच्यासोबत बैठका चालू असून ते कशा प्रकारे मदत करतील त्याकडेच आमचे लक्ष आहे असं श्रीलंकेचे उर्जामंत्री कांचना विजेसेकेरा यांनी सांगितलं. दरम्यान भारताने श्रीलंकेला दिलेल्या क्रेडेट लाईन मुळे त्यांनी भारताचे आभार मानले आहेत.

आर्थिक दिवाळखोरीमुळे संकटात सापडलेल्या श्रीलंकेचे राष्ट्रपतींनी देशातून पलायन केले असून विक्रमसिंघे यांनी प्रभारी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. त्यामुळे सध्या श्रीलंका या संकटातून सावरण्याच्या प्रयत्नात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Award List: ऑरेंज-पर्पल कॅप आणि बक्कळ पैसा... पुरस्कार सोहळ्यातही वैभव सूर्यवंशीचाच डंका! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

IPL 2026 Final: "जितेश राव, कसं वाटतंय?" हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर RCB च्या Jitesh Sharma चं मराठीतून उत्तर; म्हणाला...

Virat Kohli Reaction : "आता मॅच जिंकवण्यासाठी मला एकट्यालाच मैदानात उतरावं लागत नाही!" विराट कोहली भावुक

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षाच्या पोराने मैदान गाजवले... Orange Cap सह ५ पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, या पर्वात शिकलो की...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला ५ पुरस्कार अन् पैशांचा पाऊस! १५ वर्षांच्या पोराला कारसह BCCI कडून किती रुपयांचे बक्षीस मिळाले?

SCROLL FOR NEXT