ग्लोबल

स्पायडरमॅन, आयर्नमॅनचा निर्माता काळाच्या पडद्याआड

वृत्तसंस्था

न्यायॉर्क- अमेरिकेतील प्रसिद्ध मार्वल कॉमिक्सचे जनक आणि स्पायडर मॅन, आयर्नमॅन, हल्क यांसारख्या सुपरहिरोच्या पात्रांची निर्मिती करणारे प्रसिद्ध निर्माते स्टेन ली यांचे सोमवारी निधन झाले, ते 95 वर्षांचे होते. स्टेन ली यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अमेरिकेतील कॉमिक बुक संस्कृतीचा चेहरा अशी ली यांची ओळख होती. 

ली यांचा जन्म 28 डिसेंबर 1922 रोजी न्यूयॉर्कमध्ये झाला होता. लींचे पूर्ण नाव स्टेन ली मार्टिन लाईबर असे होते. त्यांच्या आईचे नाव सेलिया तर वडिलांचे नाव जैक होते. 1961 मध्ये त्यांनी द फॅन्टास्टिक फोरसोबत मार्वल कॉमिक्स सुरु केलं. त्यानंतर यामध्ये स्पायडरमॅन, एक्स मॅन, हल्क, आयर्नमॅन, ब्लॅक पँथर आणि कॅप्टन अमेरिका यांसारख्या सुरपहिरोंच्या पात्रांचा समावेश झाला. स्टेन ली यांनी काही हॉलिवूड चित्रपटांमध्येदेखील काम केले आहे. 

ली यांनी लिहीलेल्या या सुपरहिरोंवर कालांतराने चित्रपटही तयार झाले. या सर्व चित्रपटांना प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. त्याचबरोबर मार्वलच्या आत्तापर्यंतच्या प्रत्येक चित्रपटामध्ये स्टेन ली यांनी विशेष भुमिकाही साकारली. कॉमिक्सशिवाय ली यांनी चित्रपटांसाठी पटकथाही लिहील्या आहेत.

स्टेन ली यांचे वैशिष्ट म्हणजे त्यांनी 2013 मध्ये आपला 'चक्र' नामक पहिला भारतीय सुपरहिरोवरील चित्रपट बनवला. कार्टून नेटवर्क, ग्राफिक इंडिया आणि पाओ इंटरनॅशनल यांच्या सहकार्याने तयार झालेला 'चक्र' हा चित्रपट कार्टून नेटवर्कवर प्रदर्शित करण्यात आला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: कोलकाताला तिसरा धक्का! धोकादायक आंद्रे रसेल स्वस्तात बाद

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT