ग्लोबल

महात्मा गांधींना वर्णभेदी ठरवून विद्यापीठातून हटवला पुतळा

वृत्तसंस्था

अक्रा (घाना) - महात्मा गांधी हे वर्णभेदी होते असे ठरवून त्यांचा पुतळा विद्यापीठातून हलवण्यात आल्याची घटना अफ्रिकेतील घाना विद्यापीठात घडली आहे. आफ्रीकी वंशाच्या लोकांचे हे मानणे आहे की महात्मा गांधी वर्णभेदी होते. त्याच कारणामुळे गांधींजींचा पुतळा हटवण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी भारत आणि घाना यांच्या मैत्रीचे प्रतीक म्हणून घाना येथील विद्यापीठात महात्मा गांधींचा पुतळा बसवण्यात आला होता.

गांधींजींना रेसिस्ट अशी उपाधी देऊन घाना विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी या पुतळ्याला कडाडून विरोध दर्शवला. विद्यापीठातून गांधींचा पुतळा हटवण्यात यावा अशी मागणी सातत्याने करण्यात आली तसेच त्यासाठी आंदोलनही सुरु झाले. त्यानंतर विद्यापीठाने हा पुतळा हटवला. अफ्रिकेतील देश घाना या ठिकाणी असलेल्या अक्रा या राजधानीच्या शहरातील विद्यापीठामध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याविरोधात आंदोलनं करण्यात आली. तसेच पुतळा हटवण्याची मागणी करण्यात आली ज्यानंतर हा पुतळा हटवण्यात आला.

महात्मा गांधींचे अफ्रिकेतील समुदायांबद्दलचे विचार हे अफ्रिका खंडाचा अपमान करणारे होते त्यामुळे त्यांची प्रतिमा कुठेही लावली जाऊ नये असे आंदोलकांनी म्हटले होते. जगभरात महात्मा गांधींना अहिंचेसे प्रतीक मानले गेले आहेत. अशात अफ्रिकेतील घाना या देशाने मात्र गांधीजींना वर्णभेदी ठरवले आहे. हा पुतळा भारत सरकारतर्फे बसवण्यात आला होता. 2016 मध्ये या पुतळ्याचे अनावरण माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT