Students टिम ई सकाळ
ग्लोबल

सुमीत अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सरकारचा महत्त्वाचा सल्ला म्हणाले...

सुमीतील भारतीय विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : युक्रेनच्या युद्धग्रस्त सुमी शहरात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे व्हिडिओ समोर आल्यानंतर भारत सरकराने या विद्यार्थ्यांना घरांमध्ये सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे. सुमीमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी व्हिडिओमध्ये रशियाच्या सीमेकडे जात असल्याचे नमुद केले होते. त्यानंतर सरकारने विद्यार्थ्यांना घरांमध्ये सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच दूतावासाचे अधिकारी या विद्यार्थ्यांच्या सतत संपर्कात असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

सरकारने विद्यार्थ्यांना सुरक्षिततेची खबरदारी घेण्याचे आणि आश्रयस्थानांमध्ये राहण्याचे आवाहन केले आहे. सुरक्षित कॉरिडॉर तयार करण्यासाठी सरकारने रशियन आणि युक्रेनियन सरकारांवर तात्काळ युद्धबंदीसाठी अनेक माध्यमांद्वारे जोरदार दबाव आणला आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.

काही झाल्यास भारत सरकार जबाबदार

युक्रेनच्या ईशान्येकडील सुमी शहरात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, ते सुमारे 50 किमी दूर असलेल्या रशियन सीमेकडे धोका पत्करत निघाले असून, हा त्यांचा सुमीतील शेवटचा व्हिडिओ असल्याचे या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. तसेच आम्हाला काही झाल्यास त्याला भारत सरकार आणि दूतावास जबाबदार असेल असे देखील विद्यार्थ्यांनी व्हिडिओमध्ये म्हटले होते. दरम्यान, दूतावासाने या विद्यार्थ्यांशी संपर्क साधल्यानंतर या विद्यार्थ्यांनी रशियन सीमेवर जाण्याचा विचार रद्द केल्याचे सांगितले जात आहे.

भारत सरकारने अनेक वाहिन्यांद्वारे रशिया आणि युक्रेनच्या सरकारांना तात्काळ युद्धविराम लागू करण्याची विनंती केली असल्याचेही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने शनिवारी सांगितले आहे. जेणेकरून या भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित मार्ग मिळू शकेल. आम्ही सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षिततेशी संबंधित सर्व सूचनांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांना बंकर आणि इतर आश्रयाच्या ठिकाणी राहण्यास सांगण्यात आले आहे आणि कोणत्याही प्रकारची जोखीम न घेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT