Taiwan  sakal
ग्लोबल

Taiwan : तैवानला वादळाचा तडाखा; तिघांचा मृत्यू

फिलिपिन्समध्ये मोठे नुकसान करणाऱ्या गेईमी वादळाने तैवानला धडक दिली असून येथे मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने दैनंदिन जीवन विस्कळित झाले आहे. वादळामुळे तैवानमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

तैपेई : फिलिपिन्समध्ये मोठे नुकसान करणाऱ्या गेईमी वादळाने तैवानला धडक दिली असून येथे मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने दैनंदिन जीवन विस्कळित झाले आहे. वादळामुळे तैवानमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

गेईमी चक्रीवादळाने दोन दिवसांपूर्वी फिलिपिन्सला धडक दिली होती. पावसामुळे या देशात नद्यांना पूर येऊन अनेक घरांचे नुकसान झाले असून किमान २२ जणांचा मृत्यू झाला आहे. या देशात मोठी हानी घडविणाऱ्या वादळाने आज तैवानला धडक दिली.

वादळाची पूर्वकल्पना असल्याने तैवानमध्ये शाळा, कार्यालये यांना सुटी जाहीर करण्यात आली होती. वादळाने धडक दिल्यानंतर पावसाचा जोर वाढून अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले. वादळाशी संबंधित घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून २२० जण जखमी झाले आहेत.

तैवानला अनेकदा वादळांचा सामना करावा लागतो. त्यामुळे या देशाने त्यांची इशारा यंत्रणा सक्षम केली आहे. मात्र, या देशाचे भौगोलिक स्थान, मोठी लोकसंख्या आणि हाय-टेक अर्थव्यवस्था पाहता वादळामुळे नेहमीच मोठे नुकसान होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT