Storms in America esakal
ग्लोबल

Airlines : अमेरिकेत वादळाचा कहर; 6 हजारहून अधिक उड्डाणं रद्द

सकाळ डिजिटल टीम

अमेरिकेत आलेल्या भीषण वादळामुळं हवाई सेवेवर मोठा परिणाम होत आहे.

अमेरिकेत (America) आलेल्या भीषण वादळामुळं हवाई सेवेवर मोठा परिणाम झालाय. इथं वारंवार येणाऱ्या वादळामुळं अनेक शहरांतील उड्डाणं रद्द करावी लागली आहेत. तर, खराब हवामानामुळं सलग दुसऱ्या दिवशी हजारो उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत.

FlightAware च्या मते, शुक्रवारी 6000 हून अधिक उड्डाणं रद्द केली गेली आहेत. हवामान इतकं खराब होतं की, एकतर त्यांना रद्द करावं लागलं किंवा त्यांनी उशिरानं उड्डाण केलंय. यापूर्वी गुरुवारी 1700 हून अधिक उड्डाणं रद्द करण्यात आली होती, तर 8800 हून अधिक उड्डाणं उशिरानं झाली होती. अमेरिकेत मिसीसिपी ते व्हर्जिनियापर्यंत चक्रीवादळ येत आहेत. त्यामुळं अटलांटा, शेर्लोट, वॉशिंग्टन, डीसी आणि न्यूयॉर्क येथील विमानतळांवर विमानांची गर्दी झालीय. दरम्यान, कोविड-19 चा पुन्हा प्रसार झाल्यामुळं मोठ्या संख्येनं एअरलाइन्स कर्मचारीही उपस्थित नाहीयत.

एअरलाइन्सनं गुरुवारी अमेरिकेतील 1,500 हून अधिक उड्डाणं रद्द केली होती. न्यूयॉर्कच्या लागार्डिया विमानतळावर एक तृतीयांशपेक्षा जास्त उड्डाणं प्रभावित झालीयत. न्यू जर्सीजवळील नेवार्क लिबर्टी विमानतळावर एक चतुर्थांशहून अधिक उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. तर, काही आठवड्यांपूर्वी एअरलाइन्सनं मेमोरियल डे वीकेंडच्या आसपास पाच दिवसांच्या कालावधीत सुमारे 2,800 उड्डाणं रद्द केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT