दुबई - संयुक्त अरब अमिरातीच्या ‘अल-अमल’ (आशा) या उपग्रहाचे आज जपानमधील प्रक्षेपण केंद्रावरून मंगळाच्या दिशेने यशस्वी उड्डाण करण्यात आले. दुसऱ्या ग्रहावरील अरब जगातील ही पहिलीच मोहिम आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
जपानमधील तानेगाशिमा अवकाश केंद्रावरून एच-२ए या रॉकेटच्या साह्याने ‘अल-अमल’चे प्रक्षेपण करण्यात आले. उड्डाणानंतर काही वेळाने उपग्रह रॉकेटपासून विलग झाला आणि त्याने तसा सिग्नलही नियंत्रण कक्षाकडे पाठविला. रॉकेटपासून विलग झाल्यावर एक तासाने उपग्रहाला जोडलेले सौर पॅनेल उघडले गेले. दुबईतील अल खवानीज येथे मोहिमेचा नियंत्रण कक्ष स्थापण्यात आला आहे. हा उपग्रह पुढील सात महिन्यांत ४९ कोटी ३५ लाख किलोमीटर अंतर कापून मंगळाच्या कक्षेत पोहोचणार आहे. या मोहिमेत कोरोना संसर्गाचा सर्वांत मोठा अडथळा आला.
वर्षभर फिरणार
आतापर्यंतच्या बहुतेक मंगळ मोहिमांमध्ये उपग्रह हा दिवसाच्या ठराविक वेळीच कक्षेत फिरतो. त्यामुळे दिवसात एकदाच वातावरणाची नोंद घेतली जाते. ‘अल-अमल’ उपग्रह मात्र मंगळावरील पूर्ण एक वर्षभर, म्हणजे पृथ्वीवरील जवळपास दोन वर्षे, मंगळाभोवती फिरणार आहे.
मोहिमेची वैशिष्ट्ये
२० कोटी डॉलर एकूण खर्च
६ वर्षे उपग्रह तयार करण्यासाठी लागलेला कालावधी
६८७ दिवस उपग्रह मंगळाच्या कक्षेत फिरणार
Edited By - Prashant Patil
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.