Ukraine vs Russia Ukraine vs Russia
ग्लोबल

Russia-Ukraine Crises : रशियाकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

सकाळ डिजिटल टीम

मॉस्को : युक्रेन तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाने आण्विक कवायतींचा भाग म्हणून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी शनिवारी (ता. १९) केली. वार्षिक सरावांमध्ये किंझल आणि त्सिर्कॉन हायपरसोनिक क्षेपणास्त्रे आणि इतर अनेक शस्त्रांची चाचणी केल्याचे, निवेदनात क्रेमलिनने सांगितले आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या देखरेखीखाली केलेल्या धोरणात्मक आण्विक सरावांचा एक भाग म्हणून देशाने समुद्र आणि जमीन-आधारित लक्ष्यांवर मारा केला.

युक्रेनवर रशियाकडून (Russia) हल्ला होण्याची पाश्‍चिमात्य देशांना वाटणारी शंका दूर झाली नसताना आणि तणावाचे ढग कायम असतानाही मोठा लष्करी सराव शनिवारी (ता. १९) घेण्याचे रशियाने शुक्रवारी जाहीर केले होते. या सरावावेळी क्षेपणास्त्रांचीही चाचणी घेतली जाणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी रशियाकडून करण्यात आली.

रशिया (Russia) आणि बेलारूसचा सध्या संयुक्त लष्करी सराव सुरू आहे. या दोघांच्या सीमा युक्रेनला लागून आहेत. याच सीमेवर हा सराव झाला आहे. या सरावाच्या निमित्ताने रशियाने सीमेवर तैनात केलेल्या सैनिकांची संख्या दीड लाख झाली आहे. रशियाचे युक्रेनवर कोणत्याही क्षणी आक्रमण होऊ शकते, असा अमेरिकेचा दावा आहे.

निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवरच रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने मोठा लष्करी सराव घेण्याचे जाहीर केले होते. त्याअंतर्गत क्रूझ क्षेपणास्त्रांची चाचणी घेणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार वार्षिक सरावांमध्ये किंझल आणि त्सिर्कॉन हायपरसोनिक क्षेपणास्त्रे आणि इतर अनेक शस्त्रे प्रक्षेपित करण्यात आली, असे निवेदनात क्रेमलिनने सांगितले.

राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या देखरेखीखाली केलेल्या धोरणात्मक आण्विक सरावांचा एक भाग म्हणून देशाने समुद्र आणि जमीन-आधारित लक्ष्यांवर मारा केला, असे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. रशियन लष्करी कमांड आणि सैन्याची तत्परता तसेच त्याच्या आण्विक आणि पारंपरिक शस्त्रास्त्रांची विश्वासार्हता तपासण्यासाठी या सरावाचे नियोजन काही वेळापूर्वीच करण्यात आले होते. काही दिवसांत रशिया युक्रेनवर (Ukraine) हल्ला करू शकतो, असे संकेत आहे.

रशिया आणि अमेरिका यांच्यातील वाढलेल्या तणावादरम्यान वायडेन यांची टिप्पणी आली आहे. त्यामुळे मॉस्को युक्रेनवर हल्ला करण्याची योजना आखत असल्याची भीती निर्माण झाली आहे. रशियाने मात्र युक्रेनवर (Ukraine) हल्ला करण्याचा कोणताही विचार नसल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT