Khartoum 
ग्लोबल

Sudan Clash : सुदानमध्ये अराजक! भारतीय दुतावासानं जारी केल्या मार्गदर्शक सूचना

इथं सुरु असलेल्या संघर्षात आत्तापर्यंत १८० नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : सुदानची राजधानी खार्तुम येथे बंडखोर निमलष्करी दले (आरएसएफ) आणि सुदानचे सैन्य यांच्यादरम्यानचा संघर्ष सोमवारी तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर गोळीबार आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत.

यामध्ये सामान्य नागरिकांचेही बळी गेले असून या संघर्षांत मरण पावलेल्या नागरिकांची संख्या 180 इतकी झाली आहे तसेच शेकडोजण जखमी झाले आहेत. अनेक सैनिक मृतावस्थेत दिसून आले आहेत. यापार्श्वभूमीवर सुदानमधील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीनं तिथल्या भारतीय दुतावासानं अॅडव्हाझरी जाहीर केली आहे. (Sudan Clash new advisory issued by Indian Embassy)

खार्तुममध्ये लूटमारीच्या अनेक घटना आपल्या समोर आल्या आहेत. यापार्श्वभूमीवर सर्व भारतीय नागरिकांनी कृपया घराबाहेर पडू नये. कृपया भारतीयांनी आपला खान्यापिण्याच्या वस्तूंचा साठा करुन ठेवा कारण ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते. कृपया आपल्या शेजाऱ्यांची मदत घेण्याचा प्रयत्न करा. कृपया घरीच रहा आणि सुरक्षित रहा, असं दुतावासानं अॅडव्हाझरीमध्ये म्हटलं आहे.

सुदानमध्ये नेमकं काय घडलंय?

उत्तर अफ्रिका खंडातील सुदान हा सर्वात मोठा अरब देश आहे. या देशाची राजधानी खार्तुम इथं गेल्या तीन दिवसांपासून लष्कर आणि निलष्करी दलाच्या जवानांमध्ये झटापट आणि तुफान गोळीबाराच्या घटना सुरु आहेत. यामध्ये आत्तापर्यंत १८० लोकांचा मृत्यू झाला आहे.

सुदानमध्ये ४,००० भारतीय नागरिक, एकाचा मृत्यू

अधिकृत माहितीनुसार सुदानमधील भारतीयांची संख्या साधारण 4,000 इतकी आहे. यापैकी 1200 लोक अनेक वर्षांपासून तिकडे स्थायिक झालेले आहेत. सध्या इथं सुरु असलेल्या संघर्षात रविवारी केरळमधील रहिवासी असलेल्या व्यक्तीचा गोळीबारात मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला सर्व ती मदत केली जाईल असं केंद्र सरकारनं सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP Election Akhilesh Yadav: उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध; भाजपला टक्कर देण्यासाठी 'हे' मुद्दे घेऊन मैदानात

Onion Rate: कांद्याचे भाव घसरले! 9 दिवसांत 1,800 रुपयांची घसरण; लासलगावमध्ये आजचा दर किती?

आनंद... ज्याचा त्याचा! ; जुन्या क्रिकेट मासिकांतील दुर्मिळ लेख, छायाचित्रे आणि दिग्गज खेळाडूंच्या आठवणी जतन करण्याचा अनोखा आनंद

INDIA PAVILION AWARD: व्हेनिस आर्ट बिएनालेमध्ये भारताचा डंका! 'बेस्ट नॅशनल पॅव्हेलियन' पुरस्कार; काय आहे खास? जाणून घ्या

IND vs NZ 2nd Test Weather Update: भारत-न्यूझीलंड मॅच पाहण्यासाठी पहाटे उठण्यापूर्वी हे नक्की वाचा... Christchurch मधून Live अपडेट्स; नेमकं काय घडणार?

SCROLL FOR NEXT