Sudan Crisis 
ग्लोबल

Sudan Crisis : सुदानमधील भारतीयांना बाहेर काढण्यासाठी 'ऑपरेशन कावेरी'!

लष्कर आणि निमलष्करातील जवानांमध्ये गेल्या आठवड्यापासून संघर्ष पेटला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : सुदानमध्ये गेल्या आठवड्याभराहून अधिक काळापासून लष्कर आणि निमलष्करी दलांमध्ये मोठा संघर्ष पेटला आहे. परस्परांमध्ये गोळीबार आणि हिंसक घटनांनी सुदानची राजधानी खार्तुमची कायदा व सुव्यवस्था पार कोलमडून गेली आहे.

या हिंसाचारात दीडशेहून अधिक सुदानचे नागरिक मारले गेले आहेत, यामध्ये एका भारतीयाचाही समावेश आहे. यापार्श्वभूमीवर भारत सरकारनं सुदानमधील भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना भारतात आणण्यासाठी ऑपरेशन कावेरी लॉन्च केलं आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली.

जयशंकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, सुदानमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन कावेरी सुरु करण्यात आलं आहे. या मोहिमेंतर्गत ५०० भारतीय नागरिक सुदानच्या बंदरावर दाखल झाले आहेत. तर इतर अनेक जण लवकरच पोहोचणार आहेत. या सर्व भारतीय नागरिकांना जहाज आणि विमानांच्या मदतीनं भारतात परत आणण्यात येणार आहे. सुदानमधील आपल्या सर्व नागरिकांना मदत करण्यासाठी बांधिल आहोत.

दुसऱ्या देशात अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या बचावासाठी त्यांना बाहेर काढण्यासाठी भारतानं यापूर्वीही अनेक बाचव मोहिमा राबवल्या आहेत. यापूर्वी युक्रेन-रशियामध्ये सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये 'ऑपरेशन गंगा' राबवलं होतं. तर अफगाणिस्तानात तालिबाननं ताबा घेतल्यानंतर निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीत भारतीयांना बाहेर काढण्यासाठी 'ऑपरेशन देवी शक्ती' राबवण्यात आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Politics: राजकारण तापले! भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा पक्षत्याग, संतप्त कार्यकर्त्यांकडून फोटोला शाई फासून निषेध

Aishwarya Rai Bachchan and PM Modi VIDEO : पंतप्रधान मोदींना बघताच ऐश्वर्याने भर स्टेजवर केली अशी काही कृती, की पाहणारेही पाहातच राहिले

Latest Marathi Breaking News Live Update: पुण्यातील सर्व पेट्रोल पंप सुरू राहणार

Kolhapur News: ‘डीपी प्लॅन’, रिंगरोडला मिळेना मुहूर्त; गुंठेवारी नियमिती करणाचे घोंगडे अजूनही भिजतच

Toilet Hygiene Tips for Women: UTI थांबवण्याची सर्वात सोपी पद्धत; महिलांनी न चुकता फॉलो केल्या पाहिजेत 'या' हायजिन टिप्स

SCROLL FOR NEXT