रुतलेले महाप्रचंड जहाज मोकळे करण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न. 
ग्लोबल

सुएझ कालव्यात अद्याप ट्रॅफिक जाम

पीटीआय

इस्लामिया (इजिप्त) - इजिप्तच्या सुएझ कालव्यात अडकून पडलेले प्रचंड आकाराचे मालवाहतूक जहाज बाजूला करण्यात अद्यापही पूर्ण यश आले नसल्याने या कालव्यातून होणारा व्यापार ठप्प झाला आहे. कालव्यात तिरके होऊन फसून बसलेल्या ‘एव्हरग्रीन’ जहाजामुळे जवळपास १५० जहाजे खोळंबली आहेत.

पनामाचा झेंडा लावलेलेव जपानी उद्योगपतीच्या मालकीचे ‘एव्हरग्रीन’ हे जहाज मंगळवारी लाल समुद्रातून सुएझ कालव्यात शिरताच जोरदार वाऱ्यांमुळे बाजूला सरकले गेले आणि वाळूत रुतून बसले. हा मार्ग अत्यंत अरुंद असल्याने आणि हे जहाज जगातील सर्वांत मोठ्या जहाजांपैकी एक असल्याने जाण्या-येण्याचा मार्गच बंद पडला आहे. वाळू उपसा करून आणि इतर मार्गांनी जहाजाला मोकळे करण्याचे प्रयत्न सुरु असले तरी अद्याप त्यांना पूर्ण यश आलेले नाही. आतापर्यंत चारशे मीटर लांबीच्या या जहाजाच्या कडेच्या बाजूची वाळू उपसण्यात आली असून इतर बोटींच्या साह्याने जहाज ओढण्याचा प्रयत्न केला जात आहे. तोपर्यंत कालव्यातच खोळंबून पडलेल्या जहाजांना पुन्हा बंदरात पाठविण्यात आले आहे.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जहाजमालकाकडून माफीची याचना
‘एव्हरग्रीन’ जहाजाचे मालक शोई कायसेन यांनी या घटनेबद्दल चिंता व्यक्त करतानाच त्यामुळे अडचणीत आलेल्यांची माफी मागितली आहे. या जहाजाला बाजूला करण्यासाठी स्थानिक प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य केले जात आहे. मात्र, जहाज अत्यंत मोठे असल्याने काम कठीण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT