Sunrise 
ग्लोबल

आज तुम्हाला सूर्यास्त उशीरानं पहावयास मिळेल; जाणून घ्या कारण

सिद्धार्थ लाटकर

सातारा : जागतिक योग दिना (international yoga day) बराेबरच आजचा दिवस आणखी एका गाेष्टीसाठी खास ठरला आहे. आजची तारीख 21 जून. आजचा दिवस हा वर्षातील सर्वात मोठा दिवस (longest day of the year) ठरला आहे. हाेय हे खरं आहे. ते कसं बुवा, असा प्रश्न तुम्हां पडला असेलच ना. मग जाणून घेऊया वर्षातील आजचा दिवस हा सर्वांत माेठा दिवस कसा ठरताेय. (summer-solstice-explained-why-june-21-will-be-the-longest-day-of-the-year-in-northern-hemisphere)

पृथ्वी सूर्याभोवती फिरत असतानाचा तिचा वेग आणि कक्षेतलं पृथ्वीचं सूर्यासमोरचं स्थान यामुळे रोजचा दिवस आणि रात्रीचा कालावधी वेगवेगळा असतो. पृथ्वीला (earth) सूर्याभोवती (sun) फिरण्यास लागणाऱ्या वेगामुळे आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा मोठा ठरतो. आज सामान्यपणे दिवसातील २४ तासांपैकी १३ तासांहून अधिक काळ दिवस असतो. म्हणूनच आजचा दिवस हा वर्षातील सर्वात मोठा दिवस ठरतो. याच दिवसाला सोल्सटाईस (solstice) असंही म्हटलं जातं. आज १३ तास १३ मिनिट कालावधी हा दिवसाचा असतो तर १० तास ४७ मिनिटांची रात्र असते. आजपासून उत्तरायण संपून दक्षिणायण सुरु होते. या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते.

२१ जून हा सर्वात मोठा दिवस असला तरी प्रत्येक देशात किती तास सूर्यप्रकाश असणार याची समीकरणं वेगळी असतात. जगातल्या अनेक देशांमध्ये हा दिवस 12 तासांपेक्षाही मोठा असतो. काही ठिकाणी १३ तासांहूनही अधिक काळ सूर्यप्रकाश असतो. या दिवसाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे, याच दिवसापासून दक्षिण गोलार्धातील बऱ्याच देशांमध्ये हिवाळ्याची सुरुवात होते. काही देशांत उन्हाळा सुरु होतो.

काही देशांत २१ जून हा दिवस एखाद्या सणासारखा देखील साजरा केला जातो. पृथ्वी आपल्या कक्षेतून एक लाख पाच हजार किमी प्रति तास वेगाने सुमारे ८९ कोटी ४० लाख किलाेमीटर लंब वर्तुळाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करते. वर्षातील २१ जून जसा मोठा दिवस असतो तसाच वर्षातला लहान दिवस २२ डिसेंबर असतो. या दिवसापासून दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होत असते.

सूर्यास्तच्या वेळा

सातारा जिल्ह्यात आज सात वाजून 11 मिनीटांनी सूर्यास्त हाेईल. याबराेबरच नवी दिल्ली येथे सायंकाळी सात वाजून 21 मिनीटांनी, मुंबईत सात वाजून 18 मिनीटांनी, चेन्नईत सायंकाळी सहा वाजून 37 मिनीटांनी सूर्यास्त हाेईल. 21 जून हा सर्वात माेठा दिवस असला तरी याचा अर्थ असा नाही की लवकरात लवकर सूर्योदय हाेताे किंवा उशिरापर्यंत सूर्यास्त असतो. हे देशाच्या अक्षांश स्थानावर (latitudinal location) अवलंबून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: कर्करोग उपचार खर्च कमी होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्यात पीपीपी तत्त्वावर नवे मेडिकल सेंटर सुरू!

बुंडिबुग्यो व्हायरस, इबोलाच्या साथीचा उद्रेक; ८८ जणांच्या मृत्यूनंतर WHOने जाहीर केली ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी

Anand Paranjpe Sharad Pawar Meeting : पक्ष प्रवेश एकनाथ शिंदेंच्या पक्षात, भेट घेतली शरद पवारांची; ठाणेकर आनंद परांजपेंच्या भेटीने चर्चांणा उधाण

'सिंगल फादर असल्यानं मुलीच्या मैत्रिणी घरी येत नाही' इमरान खान म्हणाला, 'त्यांच्या आई वडिलांना माझ्याकडे मुलींना पाठवायला भिती...'

Kalyan Crime: कल्याण रेल्वे यार्डात मुलीवर अत्याचार; आरोपीला काही तासांत अटक, मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला अन् काय घडलं!

SCROLL FOR NEXT