Swami Nithyananda esakal
ग्लोबल

Swami Nithyananda च्या कैलाससारखे हे आहेत छोटे छोटे देश, एकाने तर स्वतःचं सैन्य देखील उभारलंय

तुम्हाला माहितीये काय कैलासासारखे आणखीही काही छोटे छोटे देश ज्यांना मान्यता नसली तरी सैन्य घेत ते एक स्वतंत्र जीवन जगताय

सकाळ ऑनलाईन टीम

Swami Nithyananda : सध्या स्वामी नित्यानंदच्या कैलासा देशाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. नित्यानंद यास स्वत:चं स्वतंत्र राष्ट्र म्हणवून घेतो. तसेच या देशात त्याचे नियम चालत असल्याचा दावाही त्याने केलाय. यूएनच्या मंचावर कैलासाच्या प्रतिनिधींनी अनेक दावेसुद्धा केले आहेत. मात्र तुम्हाला माहितीये काय कैलासासारखे आणखीही काही छोटे छोटे देश ज्यांना मान्यता नसली तरी सैन्य घेत ते एक स्वतंत्र जीवन जगताय. यांची लोकसंख्या फक्त 30-40 लोक एवढी आहे.

तरीसुद्धा यूएनपासून हे देश स्वत:वेगळं करण्याची मागणी देखील करताय. या राष्ट्रांत नेमकं काय चालतं त्यांची जीवनशैली काय? याबाबत जाणून घेऊया सविस्तर.

तुम्ही कधी कल्पना करुन बघितलीत का की, तुमचा स्वत:चा एक स्वतंत्र देश असावा, त्यात स्वत: आखलेली सीमा, स्वत:चं सैन्य, बजेट आणि कायदे नियम असते आणि तुम्ही कुठल्याच देशाचे काहीही ऐकत नसते तर काय झाले असते. पण जगभऱ्यात अशा छोट्या छोट्या मायक्रोनेशनची संख्या फार आहे.

काय आहे कैलासाचं रहस्य?

भारतातून पळवाट काढलेल्या स्वामी नित्यानंदने स्वत:चा वेगळा देश बनवल्याचा दावा केलाय. या देशाचे नाव कैलासा आहे. कैलासा दक्षिण आफ्रिकेच्या अॅक्वाडोरमध्ये वसलेले आहे. इथे त्याने जमिन विकत घेतली आणि त्यास स्वत:चा देश घोषित केलं. हा भाग भारतापासून जवळपास 17-18 किमी दूर आहे. नित्यानंदची शिष्या विजयप्रिया अलीकडेच कैलासाच्या प्रतिनिधिच्या रुपात यूएनच्या मिटींगमध्ये सहभागी झाली होती. येथे तिने दावा केला होता की हिंदू धर्माला मानणारे 200 कोटी लोक त्यांच्या देशाचे नागरिक आहेत तर यातील 1 कोटी लोक भगवान शिवला मानणारे आहे.

या देशाचा एकमात्र धर्म हिंदू आहे. आणि या देशात संस्कृत, तमिळ आणि इंग्रजी भाषा बोलली जाते. यूएनमध्ये विजयप्रियाने दावा केला होता की कैलासामध्ये 20 लाख अप्रवासी लोक राहातात. तसेच 150 देशांमध्ये कैलासाने एम्बसी आणि एनजीओसुद्धा उघडले आहेत.

कैलासासारखे आणखी कोणते देश आहे जाणून घेऊया

Republic Of Molossia

मायक्रोनेशन्समध्ये सगळ्यात अनोखी कहाणी आहे ती रिपब्लिक ऑफ मोलोससियाची. या देशात फक्त 34 रहिवासी आहेत. तसेच हे राष्ट्र 2.28 एकरात पसरलेले आहे. इथला कर्ताधर्ता केविन बॉघ आहे.या देशातीस करंसीचं नाव Valora असं आहे. या स्वयंभू देशात कुत्र्यांनासुद्धा नागरिकत्व मिळतं. (Global News)

Sealand

नॉर्थ सी मध्ये इंग्लंडच्या सीमेवर सीलँड हे एक मायक्रोनेशन आहे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान हे नेशन एका अँटी-एअरक्राफ्टच्या रुपात तयार झालं होतं. हा भाग समुद्रापासून बारा किमीच्या अंतरावर आहे. सध्या इथे 27 लोक राहातात.

Liberland

असं सुद्धा एक अनोखं नेशन आहे. हे नेशन क्रोएशिया आणि सर्बियाच्या मध्ये डेब्युन नदीच्या किनाऱ्यावर स्थित आहे. दोन देशांच्या युद्धात हा भाग नो मॅन लँड बनला. आणि एका व्यक्तीने इथे मायक्रोनेशनच वसवून टाकलं. इथला नेता आहे विट जेडलिका. ज्यांनी 13 एप्रिल 2015 ला या देशाची स्वतंत्र देश म्हणून घोषणा केली.

आणखी बरेच असे मायक्रोनेशन संपूर्ण जगभऱ्यात परसरलेले असून त्यांचे नियम, त्यांच्या अटींवर ते जगताय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Bandh: 'या' दिवशी भारत बंदची घोषणा, 25 कोटींहून अधिक कर्मचारी जाणार देशव्यापी संपावर, अत्यावश्यक सेवा देखील होणार ठप्प

पंढरपूर हादरलं! दोन चिमुकल्यांना विहिरीत ढकलून विवाहितेनं संपवलं जीवन; पतीनंही घेतला गळफास, कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Latest Maharashtra News Updates : भंडारा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट

Kolhapur : अखेर इचलकरंजीला पंचगंगेचे शुद्ध पाणी मिळणार, ६०९ कोटी रूपये मंजूर; दोन वर्षात 'झेडएलडी’ प्रकल्प पूर्णत्वास येणार

११ वर्षांत २० टक्केच अनुदान! 'नैसर्गिक टप्पा वाढीच्या निर्णयाला बगल'; आजपासून शाळा बंद ठेवून शिक्षकांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT