स्वित्झर्लंडमध्ये आधीपासूनच इच्छामृत्यूला कायदेशीर परवानगी आहे. आता एका मिनिटात कुठलाही त्रास न होता शांततापूर्ण मृत्यू देणाऱ्या यंत्राला (Suicide Machine) कायदेशीर परवानगी देण्यात आली असल्याचे या यंत्राच्या निर्मात्यानं सांगितलं आहे.
स्वित्झर्लंडमध्ये इच्छामृत्यू कायदेशीर आहे. गेल्या वर्षी सुमारे 1,300 लोकांनी इच्छामृत्यूसाठी एनजीओच्या सेवांचा वापर केला होता. त्याच पार्श्वभूमीवर एक्झिट इंटरनॅशनल या एनजीओचे संचालक डॉ. फिलीश नित्शके यांनी हे यंत्र तयार केले असून त्यांना डॉ. डेथ नावाने देखील ओळखले जाते. एखादी व्यक्ती शरीराच्या कुठल्याही अवयवाची हालचाल करत नसेल आणि फक्त डोळे मिचकावत असेल अशा परिस्थितीतही हे यंत्र काम करणार आहे. मृत्यूची इच्छा असलेल्या व्यक्तीच्या आवडत्या ठिकाणी यंत्राला नेलं जातं. त्यानंतर ऑक्सिजनची पातळी अतिगंभीर पातळीवर आणून त्या व्यक्तीला इच्छामरण दिले जाते. याबाबत इंडिपेंडेंट यूकेने याबाबत वृत्त दिले आहे.
इच्छामरणाबद्दल आणि अशा उपकरणांच्या वापराविषयी सतत वादविवाद सुरू आहेत. तरीही असे काही देश आहेत ज्यांनी दीर्घकाळ आजारी असलेल्या रुग्णांची स्थिती लक्षात घेऊन इच्छामृत्यूला परवानगी दिली आहे. डॉक्टर किंवा ती संबंधित व्यक्ती स्वतः इच्छामरणासाठी शिफारस करू शकते.
इच्छामृत्यूसाठी यंत्र तयार करणं हे आमच्यासाठी खूप मोठं काम होतं. आता या यंत्राला परवानगी मिळाली आहे. वापरताना या यंत्रामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. येत्या २०२२ मध्ये हे यंत्र मृत्यूची इच्छा असलेल्या लोकांच्या सेवेत असेल, असेही डॉ. फिलिप म्हणाले. दरम्यान, अनेकांनी या यंत्रावर टीका देखील केली आहे. नायट्रोजनची पातळी वाढवून ऑक्सिजनची पातळी कमी होते. त्यामुळे व्यक्तीचा मृत्यू होतो. त्यामुळे अनेकांनी या यंत्राला गॅस चेंबर देखील म्हटले आहे.
भारतात इच्छा मृत्यू किंवा दया मृत्यू या दोन्ही अवैध आहेत. भारतीय दंडविधान कलम ३०९ अंतर्गत हा आत्महत्येचा गुन्हा आहे. मात्र, सुप्रीम कोर्टाने निष्क्रिय इच्छा मृत्यूला परवानगी दिली आहे. निष्क्रिय इच्छा मृत्यू म्हणजे एखाद्या दुर्धर अशा आजाराने ग्रस्त व्यक्तीचा मृत्यू अटळ असतो आणि औषधोपचार केले तरी त्याने फारसा फरक पडणार नाही अशावेळी उपचार बंद केले जातात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.