Tahawwur Rana 
ग्लोबल

मुंबई हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणा अमेरिकेच्या ताब्यातच राहणार

कार्तिक पुजारी

२००८ मध्ये झालेल्या २६/११ च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर हुसैन राणा (Tahawwur Rana) तुर्तास अमेरिकेच्या ताब्यातच राहणार आहे. लॉस एंजेलिसमधील फेडरल कोर्टाने याबाबत सुनावणी केली.

वॉशिंग्टन- २००८ मध्ये झालेल्या २६/११ च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर हुसैन राणा (Tahawwur Rana) तुर्तास अमेरिकेच्या ताब्यातच राहणार आहे. लॉस एंजेलिसमधील फेडरल कोर्टाने याबाबत सुनावणी केली. मेजिस्ट्रेट न्यायमूर्ती जॅकलीन चुलजिअन यांनी वकीलाला १५ जुलैपर्यंत अधिक डॉक्युमेंट जमा करण्याचे आदेश दिले आहेत. सुनावणीवेळी राणाच्या दोन मुली उपस्थित होत्या. पण, त्यांनी कोणतंही वक्तव्य करण्यास टाळलं. एएनआयने असोसिएटेड प्रेसच्या हवाल्याने हे वृत्त दिलंय. (Tahawwur Rana involvement in the 2008 Mumbai terror attack will remain in the United States)

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर हुसैन राणा याला २००९ मध्ये अमेरिकेत पकडण्यात आलं होतं. मुंबई दहशतवादी हल्ल्यात अमेरिकी नागरिकही मारले गेले होते, त्यामुळे तिथे त्याच्यावर खटला चालवण्यात आळा. तहव्वूर हुसैन राणा हा मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणीची अमेरिकेतील चौदा वर्षांची शिक्षा भोगून सुटला आहे. भारताने अमेरिकेकडे त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे. पण, अद्याप त्याचे प्रत्यार्पण होऊ शकलेले नाही.

२६/११ च्या हल्ल्यापूर्वी तहव्वूर हुसैन राणा नोव्हेंबर महिन्यातच डेव्हिड हेडलीचा साथीदार म्हणून एका महिलेसोबत भारतात आला होता. तो कोचीतही गेला होता. तहव्वूर हुसैन राणासोबत असलेल्या महिलेचं नाव समराझ हुसेन असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तहव्वूर हुसैन राणा हा कॅनडातील इमिग्रेशन कन्सल्टंट म्हणून कोचीत आला होती, तशी जाहिरात त्याने कोचीतल्या वर्तमान पत्रांमध्ये दिली होती. कॅनडात जाणाऱ्यांना व्हिजा देण्यासाठी तो कोचीत येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यादिशेने तपासही सुरु केला होता. यानंतर दुसऱ्या दिवशी तो मुंबईत परतला होता.

दरम्यान, २६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर हुसैन राणा याला भारतात आणण्याची प्रक्रिया जटिल आहे. त्यामुळे त्याच्या प्रत्यार्पणास उशीर होत आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालय, विधी आणि न्याय मंत्रालय त्याचसोबत गृह मंत्रालयाची अमेरिकी परराष्ट्र मंत्रालय, विधी आणि न्याय मंत्रालय सोबतच गृह मंत्रालयातील या दोघांची काम करण्याची पद्धत आणि प्रक्रिया वेगवेगळ्या असल्याने प्रत्यार्पणाची प्रोसेस गुंतागुंतीची असल्याचं समजतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

America-Iran War: होर्मुजच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव! २४ तासांत तीन तेल जहाजांवर हल्ले

SCROLL FOR NEXT