Taiwan Nurses
Taiwan Nurses eSakal
ग्लोबल

Taiwan Nurses : भूकंपामध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून केलं बाळांचं रक्षण; तैवानच्या रुग्णालयातील 'हिरकण्यां'चा व्हिडिओ व्हायरल

Sudesh

Taiwan Earthquake Hospital Viral Video : दोन एप्रिल रोजी तैवानला भूकंपाचा मोठा धक्का बसला होता. तब्बल 7.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे देशातील कित्येक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या भूकंपाची भीषणता एवढी होती, की कित्येक मोठ्या इमारती यात पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. हा भूकंप सुरू असताना एका रुग्णालयामधील नर्सेसनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बाळांचं रक्षण केलं. या प्रसंगाचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

तैवानमधील भूकंपात सुमारे सात जणांचा मृत्यू झाला, आणि 700 हून अधिक नागरिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. गेल्या 25 वर्षांमध्ये तैवानला बसलेला हा सर्वात मोठा भूकंप असल्याचं सांगण्यात आलं. अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र विभागानुसार आणखीही भूकंपाचे धक्के बसले होते. यातील एक धक्का 6.5 रिश्टर स्केलचा होता, अशी माहिती माध्यमांनी दिली.

तैवान न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ तैपेईमधील एका रुग्णालयातील आहे. या रुग्णालयातील मॅटर्निटी वॉर्डमध्ये सुमारे 10-12 नवजात बालकंं होती. भूकंपाचे धक्के सुरू होताच तीन नर्सेस याठिकाणी धावत आल्या. बाकी रुग्ण आणि इतर नागरिक रुग्णालयातून बाहेर पडण्याला प्राधान्य देत असताना या नर्सेस मात्र बाळांना पकडून थांबल्या होत्या. वरुन पडणारी एखादी गोष्ट किंवा काचेचे तुकडे या बाळांना लागू नयेत याची खबरदारी त्या घेत होत्या. तसंच बाहेर पडण्याचा मार्ग खुला असल्याचंही त्यांनी सुनिश्चित केलं.

या भूकंपामुळे देशात कित्येक ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या. तर 35 रस्ते, कित्येक पूल आणि बोगद्यांना तडे गेले. भूकंपामुळे झालेल्या अपघातात देखील कित्येक नागरिक जखमी झाले. या भूकंपामुळे जपानला त्सुनामीचा इशारा देखील देण्यात आला होता. काही तासांनंतर तो मागे घेण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT