Taiwan Parliament  
ग्लोबल

Viral Video: संसदेमध्ये असला राडा कधीच पाहिला नसेल! सभागृहात खासदारांमध्ये तुफान हाणामारी, पाहा व्हिडिओ

Taiwan Lawmakers Engage In Physical Scuffle: नवे अध्यक्ष लाय चिंग ते यांच्या शपथविधीपूर्वीच्या दोन दिवस आधी येथील सभागृहात तुफान हाणामारी झाली.

कार्तिक पुजारी

Taiwan News: तैवानच्या संसदेत सादर केलेल्या एका विधेयकावरून सभागृहात खासदारांमध्ये तुफान हाणामारी झाली. सरकारी कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी विरोधी पक्षाच्या खासदारांना जास्त अधिकार देण्याचा प्रस्ताव या विधेयकात आहे. नवे अध्यक्ष लाय चिंग ते यांच्या शपथविधीपूर्वीच्या दोन दिवस आधी येथील सभागृहात तुफान हाणामारी झाली. त्याचे व्हिडिओही व्हायरल झाले आहेत.

काही खासदार संसद अध्यक्षांच्या खुर्चीवरही चढले. एकमेकांना ओढून मारहाणही करीत होते. त्याचवेळी एक खासदार एका विधेयकाच्या दस्तावेज घेऊन पळून जाताना व्हिडिओत दिसत आहे. सरकारच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासह संसदेत खोटी विधाने केल्यास सरकारी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असे या विधेयकात नमूद केले आहे. (Taiwan Parliament Viral Video)

विधेयकावरील मतदानापूर्वी नवनिर्वाचित अध्यक्ष चिंग ते यांच्या डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (डीपीपी) आणि चीन समर्थक विरोधी पक्ष की कुमेतांग पार्टीच्या (केएमटी) सदस्यांमध्ये हाणामारी झाली. चिंग ते यांचा काही दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये विजय झाला. ते लवकरच पदाची शपथ घेणार आहेत. ते चीन विरोधी असल्याचं बोललं जातं.

मिळालेल्या माहितीनुसार, जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पाच जणांना जखमा झाल्या आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यामध्ये डीपीपी आणि केएमटी या दोन्ही पक्षाच्या नेत्यांचा समावेश आहे. संसदेत विधेयकावर चर्चा सुरू असताना हा प्रकार घडला. खासदारांनी एकमेकांना शिवीगाळ आणि मारहाण केली आहे. विधेयकावरून गेल्या काही दिवसांपासून संसदेत खदखद निर्माण झाली. संसदेबाहेर देखील लोकांनी आंदोलन केले होते.

संसदेत पाहायला मिळाला हा राडा अभूतपूर्व होता. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकजण यावर प्रतिक्रिया देत आहे. सदर गोंधळासाठी काहींनी चीन समर्थक केएमटी पक्षाला जबाबदार धरलं आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर वाद तूर्तास निवळला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Care : कोण म्हंटल माधुरी हत्तीचा विषय शांत झालाय, वनताराची टीम पुन्हा नांदणीत; आजच्या बैठकीत काय घडलं?

Jalgaon News : जळगाव महापालिकेत लाचखोरीचा पर्दाफाश; लिपिक व समन्वयक एसीबीच्या जाळ्यात

Rain-Maharashtra Latest Live News Update: ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प- ईसापुर धरण पाणी पातळी वाढ

Rajiv Gandhi : अन् राजीव गांधी मुंबईतून गेले ते कायमचेच! राजभवनातील माजी अधिकाऱ्याने सांगितली शेवटच्या भेटीची आठवण

Beed Crime: सुरेश धस यांचे कार्यकर्ते आहोत, असं म्हणत एकाला बेदम मारहाण; शिरुरमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT