XI JINPING. sakal
ग्लोबल

आपले भवितव्य आपल्याच हाती ठेवा

जिनपिंग यांचे आशियातील देशांना आवाहन

सकाळ वृत्तसेवा

बीजिंग : प्रत्येकाने इतर देशांच्या सार्वभौमत्वाचा आदर करावा, असे आवाहन चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आज आशियातील देशांना केले. तसेच, ‘आपले भविष्य आपल्याच हातात राहू द्या,’ असे म्हणत जिनपिंग यांनी जागतिक सुरक्षा यंत्रणेचा प्रस्ताव सर्वांसमोर ठेवला. हिंद-प्रशांत क्षेत्रात अमेरिका आपले सामर्थ्य वाढविण्याचा प्रयत्न करत असल्याने चीनने अमेरिकेवर अनुल्लेखाने टीका केल्याचे मानले जात आहे.

आशिया परिषदेच्या बाओआ फोरमच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात व्हिडिओ लिंकद्वारे सहभागी झालेल्या जिनपिंग यांनी जागतिक सुरक्षेसाठी सहा मुद्द्यांचा एक प्रस्ताव मांडला. युक्रेनने नाटो संघटनेत सहभागी होण्यास रशियाने स्वत:च्या सुरक्षेच्या कारणास्तव विरोध करत युद्धाचा मार्ग स्वीकारला, त्याचे एकप्रकारे समर्थनच जिनपिंग यांनी केले आहे. जिनपिंग म्हणाले की,‘प्रत्येक देशाने इतरांच्या सार्वभौमत्त्वाचा आदर करावा आणि इतरांच्या अंतर्गत घडामोडींमध्ये हस्तक्षेप करू नये.

इतर देशांनी सामाजिक यंत्रणेचा आणि विकासाचा जो मार्ग स्वीकारला आहे, त्याचाही आदर करावा. आपल्या सुरक्षेची काळजी घेण्याचा प्रत्येक देशाला अधिकार आहे. त्यामुळे समतोल, परिणामकारक आणि शाश्‍वत सुरक्षा यंत्रणा उभारण्यासाठी प्रयत्न व्हावेत. आपल्या सुरक्षेसाठी दुसऱ्याची सुरक्षा धोक्यात घालण्याच्या प्रयत्नांना विरोध व्हावा. प्रत्येक देशाने आपले भविष्य आपल्याच हातात ठेवावे.’

जगातील सर्व देश हे एकाच जहाजावर असलेल्या प्रवाशांसारखे आहेत. वादळातून जहाजाला बाहेर काढण्यासाठी प्रवाशांची एकजूट असणे आवश्‍यक आहे. एका प्रवाशाला सर्वांनी बाहेर फेकून देण्याचा विचार मान्य नाही.

- शी जिनपिंग, अध्यक्ष, चीन

जिनपिंग म्हणाले...

  • वाद शांततेच्या मार्गाने सोडवावेत

  • दुटप्पीपणाला विरोध करावा

  • एकतर्फी निर्बंधांना विरोध करावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT