taliban  sakal media
ग्लोबल

Afghanistan Crisis : तालिबान्यांचा पत्रकारांवर पुन्हा हल्ला

महिला मोर्चाचे वार्तांकन करणाऱ्यांना रोखले

सकाळ वृत्तसेवा

काबूल : महिलांबाबत भेदभाव करणार नाही असा दावा करणाऱ्या तालिबानला शब्दाला जागण्याची फिकीरही वाटत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. महिलांना हक्कांसाठी मोर्चा काढावा लागला आणि त्याचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांवर हल्ला करण्यात आला. गुरुवारी घडलेल्या अशा दोन घटनांमुळे तालिबानचे पितळ उघडे पडले.

सुमारे वीस महिलांच्या गटाने शिक्षण मंत्रालयाची इमारत ते अर्थ मंत्रालयाची इमारत असा मोर्चा काढला होता. या महिलांनी डोक्याला रंगीबेरंगी स्कार्फ बांधले होते. दहा वाजण्याच्या सुमारास वाहतूक सुरु असताना त्यांनी घोषणा दिल्या. शिक्षणाला राजकीय रंग देऊ नका ही त्यांची मुख्य घोषणा होती. आम्हाला शिक्षणाचा आणि नोकरीचा अधिकार नाही, बेरोजगारी, गरिबी आणि भूक असा मजकूर असलेले फलकही त्यांनी झळकावले होते. हवेत हात उंचावत त्यांनी घोषणा दिल्या.

तालिबानी अधिकाऱ्यांनी सुमारे दीड तास या महिलांना निदर्शने करू दिली, असे त्यावेळी उपस्थित असलेल्या एएफपी वृत्तसंस्थेच्या पत्रकारांनी सांगितले. एका तालिबानी बंडखोराने एका परदेशी पत्रकाराला बंदुकीच्या दस्त्याने मारले. एका छायाचित्रकाराच्या पाठीवर एका बंडखोराने लाथ मारली, तर दुसऱ्याने ठोसा लगावला. तालिबान्यांनी मुठी उगारून आणि लाथा झाडून पत्रकारांना पांगण्यास भाग पाडले. त्यावेळी इतर किमान दोन पत्रकारांना मारण्यात आले.

मोर्चा काढलेल्या महिलांच्या बाजूला काही लहान मुले चालत असल्याचे दिसून आले, पण ते या महिलांशी संबंधित होते का हे स्पष्ट होऊ शकले नाही. मोर्चाच्यावेळी बंदोबस्तासाठी तालिबानी बंडखोर हजर होते. काही जणांनी चिलखत, हेल्मेट, गुडघ्यावरील पॅड आदी घातले होते. लढाईसाठी वापरली जाणारे शस्त्रे त्यांच्याकडे होती. अनेकांकडे अमेरिकी बनावटीच्या एम१६ आणि एके-४७ या बंदुका होत्या. इतरांनी पारंपरिक पोशाख घातले होते.

धोका असूनही मोर्चा

मोर्चाचे आयोजन केलेल्या झाहरा मोहम्मदी या महिनेले सांगितले की, धोका असूनही महिलांनी निदर्शने केली. परदेशी किंवा स्थानिक अशा कोणत्याच पत्रकारांचा तसेच महिलांचा तालिबानी आदर करीत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. मुलींसाठी शाळा खुल्या केल्या गेल्याच पाहिजेत, पण तालिबानने आमचा हा हक्क काढून घेतला आहे.

तालिबानला घाबरू नका

झाहराने मुलींना आणि महिलांना संदेश दिला. ती म्हणाली की, तुमच्या कुटुंबीयांनी तुम्हाला घराबाहेर पडू दिले नाही तरी तालिबानला घाबरू नका. बाहेर पडा, त्याग करा, तुमच्या हक्कांसाठी लढा द्या. आपल्याला बलीदान द्यावे लागेल, जेणेकरून पुढील पिढी शांततेत जगू शकेल.

महिला व्हॉलिबॉलपटूचे तालिबानकडून शिरकाण

दोन महिन्यापूर्वी अफगाणिस्तानात सत्तेवर आलेल्या तालिबानने एका महिला व्हॉलिबॉलपटूची गळा चिरून हत्या केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे प्रकरण समोर आले आहे. मेहजबीन हकीमी असे मृत खेळाडूचे नाव आहे. हजारा समुदायातील असल्याने तिची हत्या केली असावी, असा अंदाज आहे. तालिबानला या अल्पसंख्याक समुदायविरुद्ध द्वेष असल्याचे सांगितले जाते. अफगाणिस्तानच्या ज्युनिअर व्हॉलिबॉल संघाच्या प्रशिक्षकाने सोशल मीडियावर महिला खेळाडूच्या हत्येची माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock : 'या' एका स्टॉकने गुंतवणूकदारांची केली चांदी! तुमची १ लाखाची गुंतवणूक आज झाली असती ६४ लाख रुपये...

Latest Marathi News Live Update : पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडून उमेदवारांच्या प्रचारार्थी मॅरेथॉन बैठका

Video : अर्जुन स्वतःच्या जीवाशी खेळून महिपतला पोलिसांच्या हवाली करणार ! नव्या ट्विस्टने प्रेक्षकही चकित

Mumbai Election : भाजपमधून  26  बंडखोरांची हकालपट्टी; मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांची कारवाई, सहा वर्षांसाठी पक्षातून केलं निलंबन

Whatsapp : पालकांसाठी खुशखबर! व्हॉट्सअ‍ॅपची लपवा-छपवी संपणार; तुमची मुलं काय करतात, कुणाशी बोलतात सगळं कळणार, नवीन फीचर काय आहे पाहा

SCROLL FOR NEXT