IIT mumbai sakal media
ग्लोबल

अफगाणिस्तानमधील विद्यार्थ्यांना आयआयटी मुंबई संकुलात परतण्यास परवानगी

संजीव भागवत

मुंबई : तालिबान्यांनी (Taliban) केलेल्या आक्रमणामुळे (attacks) अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन आयआयटी मुंबईने (IIT Mumbai) या देशात असलेल्या विद्यार्थ्यांना आयआयटी कॅम्पस (IIT campus) मध्ये परत यावे, त्यांना परतण्यास आम्ही परवानगी (permission) देत आहोत, त्यामुळे त्यांना संकुलात राहण्याची, सुरक्षा पूरवू असे आज आयआयटी मुंबईकडून स्पष्ट करण्यात आले.

आयआयटी मुंबईमध्ये अफगाणिस्तान मधील एकूण 11 विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यापैकी दोन वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये दोघेजण सध्या संकुलात शिक्षण घेत आहेत. तर उर्वरित 9 विद्यार्थी हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानमध्ये राहून ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. अफगाणिस्तानमध्ये सध्या निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या विद्यार्थ्यांनी आयआयटी मुंबईच्या संकुलात येण्याची आम्ही परवानगी देत आहोत, त्यांना आम्ही शिक्षण आणि संकुलात राहण्याची सुरक्षा देऊ असे आश्वासन आयआयटी मुंबईकडून देण्यात आले आहे.

आयसीसीआरच्या शिष्यवृत्ती अंतर्गत यंदाच्या वर्षी आयआयटी मुंबईने काही अफगाण विद्यार्थ्यांना मास्टर प्रोग्रामसाठी प्रवेश दिला होता. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हे विद्यार्थी त्यांच्या अफगणिस्तानमधील घरातूनच ऑनलाईन लेक्चरला उपस्थित राहत आहेत. मात्र आता तालिबान्यांच्या हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे या विद्यार्थ्यांना भरतात येऊन आयआयटी मुंबई संकुलमधील वसतिगृहात परतावे,असे आवाहन केले आहेत.अफगाणिस्तान मधील एकूणच परिस्थिती लक्षात घेता आयआयटी मुंबई मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना यांना जर त्यांच्या शिक्षणात खंड पडला तर पुढील वर्षी त्यांना संधी दिली जाईल अशी माहितीही आज आयटी मुंबई कडून देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

Crime News : कसबे सुकेणे हादरले! शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न, गावकऱ्यांनी आरोपींना दिला चोप

Thane News: मराठीसाठी लढणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास स्वराज्य विनामूल्य केस लढणार, ॲड. जय गायकवाड यांची भूमिका

Shravan Pradosh Vrat 2025: यंदाच्या श्रावणात किती प्रदोष व्रत आहेत? जाणून घ्या तारीखा आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT