ग्लोबल

डॅशिंग कार खेळल्यानंतर तालिबान्यांनी अम्युझमेंट पार्कचं पेटवून दिलं?

अफगाणिस्तानवर (Afganistan) ताबा मिळवल्यानंतर तालिबानचा खरा चेहरा आता हळूहळू समोर येऊ लागला आहे.

दीनानाथ परब

काबूल: अफगाणिस्तानवर (Afganistan) ताबा मिळवल्यानंतर तालिबानचा खरा चेहरा आता हळूहळू समोर येऊ लागला आहे. काल काबुलच्या (Kabul) अम्युझमेंट पार्कमध्ये (amusement park) तालिबानी (taliban) बंडखोर डॅशिंग कार आणि मेरी-गो-राऊंडचा आनंद घेताना दिसले होते. आता दुसरा एक व्हिडीओ समोर आला असून यामध्ये या अम्युझमेंट पार्कला आग लागल्याचे दिसत आहे.

तालिबाननेच हे अम्युझमेंट पार्क पेटवून दिल्याची शक्यता आहे. अम्युझमेंट पार्कमध्ये लहानांपासून मोठ्यांसाठी खेळांची विविध साधने उपलब्ध असतात. काबुलवर ताबा मिळवल्यानंतर या तालिबानी बंडखोरांनी अम्युझमेंट पार्कमध्ये जाऊन मेरी-गो-राऊंड आणि डॅशिंग कार खेळण्याचा आनंद घेतला. ते व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

आता नव्या व्हिडीओमध्ये रात्रीच्यावेळी संपूर्ण अम्युझमेंट पार्क आगीच्या ज्वाळांनी वेढल्याचे दिसत आहे. ज्या टि्वटर युझरने हा व्हिडीओ शेअर केलाय, त्याने शेबेरगनमधील हे बोखडी पार्क असल्याचा दावा केला आहे. पार्कमधील पुतळे इस्लामच्या विरोधात आहेत, त्यामुळे तालिबानने हे अम्युझमेंट पार्क पेटवून दिल्याचा दावा या टि्वटर युझरने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latur Extortion Case: डॉक्टरकडे खंडणी मागणारे तिघे अटकेत; लातूर शहरामध्ये कारवाई, एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा

Major Mohit Sharma: भारताचा खरा 'धुरंधर' मोहित शर्मा जेव्हा इफ्तिखार भट्ट झाला, काश्मिरमध्ये काय घडलं होतं?

Latest Marathi News Update LIVE : शितल तेजवानी पुणे पोलिस आयुक्तालयात दाखल

सिनेमा फक्त त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल कसा दाखवता? 'बाजीराव मस्तानी' चित्रपटावर शरद पोंक्षे म्हणतात- 'केवळ ब्राह्मणद्वेषातून…'

ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळून ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसानंतर अपघात झाल्याचं आलं समोर

SCROLL FOR NEXT