Danish Sidiqui File Photo
ग्लोबल

सिद्दीकींची तालिबान्यांनी ओळख पटवून मग केली हत्या; अमेरिकन मासिकाचा मोठा दावा

विनायक होगाडे

वॉशिंग्टन : जागतिक प्रतिष्ठेचा पुलित्झर हा पुरस्कार जिंकलेले भारतीय छायाचित्र पत्रकार दानिश सिद्दिकी यांचा अफगाणिस्तानामधील हिंसेचं वृत्तांकन करताना मृत्यू झाला होता. त्यांची हत्या कशी झाली, याबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध झाली नव्हती. नेमक्या कोणत्या गोळीबारात ते मृत्यूमुखी पडले, याबाबत स्पष्टता नव्हती. मात्र, आता त्यांच्या मृत्यूबद्दल महत्त्वाचा दावा अमेरिकेच्या एका मासिकाने केला आहे.

छायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांच्या हत्येबाबत मोठा दावा करण्यात आलेल्या या दाव्यात म्हटलंय की, दानिश सिद्दीकीला तालिबानी दहशतवाद्यांनी आधी जिवंत पकडलं होतं. त्यानंतर, दानिश सिद्दीकीची ओळख पटवली आणि त्यानंतर तालिबान्यांनी दानिश यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. थोडक्यात, त्यांचा मृत्यू गाोळीबारात झआला नसून त्यांची ओळख पटवून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे, असं ‘वॉशिंग्टन एक्झामिनर’ या मासिकाने म्हटलंय. गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या एका रिपोर्टमध्ये त्यांनी हा दावा केला आहे.

सिद्दीकी हे अफगाणिस्तानमध्ये सुरु असलेला हिंसक संघर्षाचे छायचित्रण करण्यासाठी गेले होते. कंदहार शहरामध्ये स्पिन बोल्दाक भागात अफगाणी फौजा व तालिबान यांच्यातील संघर्षाचं छायाचित्रण करताना त्यांचा मृत्यू झाला होता.

काय आहे नेमका दावा?

तालिबानने त्याला पकडले तेव्हा सिद्दीकी जिवंत होते, असा मोठा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आलाय. तालिबानने सिद्दीकीची ओळख पटवली केली आणि नंतर त्याची आणि त्याच्या साथीदारांची हत्या केली. पुढे या अहवालात म्हटलंय की, हल्ल्याच्या वेळी सिद्दीकीला गोळी लागली म्हणून तो आणि त्याची टीम स्थानिक मशिदीत गेली, तिथे त्यांना प्राथमिक उपचार मिळाले. मात्र, मशिदीत एक पत्रकार असल्याची बातमी पसरताच तालिबान्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. सिद्दीकीच्या उपस्थितीमुळे तालिबान्यांनी मशिदीवर हल्ला केल्याचं स्थानिक तपासात उघड झालंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार? विखे पाटलांनी दिली मोठी माहिती

Car Accident : समृद्धी महामार्गावर भरधाव कारची अज्ञात वाहनाला धडक; एक ठार, दोघे गंभीर

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Ketu Transit Lucky Zodiac Signs: ‘या’ ६ राशींच्या नशिबात येणार मोठा ट्विस्ट; केतूच्या गोचराने मिळणार धनलाभाची संधी, पाहा तुमची रास आहे का?

Marathi News Live Updates: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT