तालिबानी ‘उदार’ sakal
ग्लोबल

'तालिबान'ची जगाला आश्वासने व सूचना

जनतेला दिली माफी; महिलांनाही सत्तेत निमंत्रण

सकाळ वृत्तसेवा

काबूल : अफगाणिस्तानवर (afghanistan) ताबा मिळविल्यानंतर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विरोध टाळण्यासाठी तालिबानने (taliban) सर्वांना माफी जाहीर केली आहे. तसेच महिलांनी त्यांच्या सरकारमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी आज केले. काबूलमध्‍ये विमानतळावर सोमवारी (ता. १६) निर्माण झालेल्या गोंधळाच्या आणि तणावाच्या पार्श्‍वभूमीवर शांतता प्रस्थापित करण्याचा त्यांचा हा प्रयत्न असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचा सदस्य इनामुल्ला समानगणी याने आज संवाद साधला. ‘अफगाणिस्तानमधील चाळीस वर्षांतील संघर्षात महिलाच मुख्य बळी ठरल्या आहेत. महिलांवर अन्याय व्हावा, असे इस्लामी अमिरातीला (तालिबानच्या राजवटीतील अफगाणिस्तान) वाटत नाही. त्यांनी शरीया कायद्यानुसार सरकारी व्यवस्थेत सहभागी व्हावे. सरकारचे धोरण अद्याप निश्‍चित झालेले नाही. तरी देशात संपूर्ण इस्लामी नेतृत्व असेल आणि सर्व पक्ष त्यात सहभागी होतील,’ असे त्याने सांगितले.

मात्र, सत्तेबद्दल अधिक तपशील दिला नाही. तालिबानला अपेक्षित इस्लामी कायदे लोकांना आधीच सांगितले आहेत. आमची जनता मुस्लिम आहे आणि त्यांना सक्तीने इस्लामी करून घेणार नाही, असेही त्याने स्पष्ट केले. काबूलमध्ये अत्याचार किंवा संघर्षाची कोणतीही घटना अद्याप नोंदविण्यात आलेली नसली तरी तुरुंगातील कैद्यांची तालिबान्यांनी सुटका केल्यानंतर आणि हत्यारे लुटीनंतर भयभीत झालेल्या नागरिकांनी स्वत:ला घरात बंदिस्त करून घेतले आहे.

या देशांचे नागरिक परतले

  • अमेरिकेच्या नौदलाचे हर्क्युलस विमान काबूलहून कतारला रवाना

  • गोंधळामुळे जर्मनीच्या मालवाहू विमानातून केवळ सात जण मायदेशी रवाना

  • स्वीडनचे नागरिक मायदेशी परतले

  • भारताचेही १५० नागरिक मायदेशी

तालिबानची आश्‍वासने व सूचना

  • अफगाणिस्तान जनतेचे, त्यांच्या मालमत्तेचे आणि सन्मानाचे रक्षण ''इस्लामिक अमिरात करेल

  • महिलांच्‍या हक्कांचे रक्षण

  • महिलांना शिक्षण व कामास परवानगी. हिजाब अनिवार्य

  • देशात शांतता व सुरक्षित वातावरण निर्मिती

  • विदेशी सैन्य आणि पूर्वीच्या प्रशासनात काम केलेल्या अथवा मदत केलेल्या सर्वांना माफी

  • कोणाच्याही खासगी मालमत्तेत (मोटार, निवासस्थान, दुकाने, बाजारपेठा) स्वारस्य नाही

  • नागरिकांचे संरक्षण आणि राष्ट्रीय संपत्तीचे जतन करणे ही प्राथमिक जबाबदारी

  • नागरिकांनी नेहमीप्रमाणे व्यवहार सुरु करावेत. विशेषतः शैक्षणिक, आरोग्य, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील कामकाज सुरू व्हावे

  • सर्व देशांचे राजनैतिक अधिकारी, दूतावास, वाणिज्य दूतावास आणि राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्था यांना कोणताही त्रास नाही.

तालिबान चर्चेसाठी तयार

माजी अध्यक्ष हमीद करझाई आणि अब्दुल्ला अब्दुल्ला यांच्यासह अफगाणिस्तानमधील राजकीय नेत्यांबरोबर चर्चा करण्याची तयारी तालिबानी म्होरक्यांनी दाखविली असून त्यासाठी अनेक वरच्या फळीतील म्होरके काबूलमध्ये दाखल झाले आहेत. तालिबानी नेता अमीर खान मुत्ताकी हा तालिबान्यांच्यावतीने चर्चा करणार असल्याचे समजते. मुत्ताकी हा तालिबानी सत्तेच्या काळात शिक्षण मंत्री होता.

मी नवा काळजीवाहू अध्यक्ष : अमरुल्ला सालेह

अफगाणिस्तानचे उपाध्यक्ष अमरुल्ला सालेह यांनी स्वतःला आज देशाचा नवा काळजीवाहू अध्यक्ष म्हणून घोषित केले. विद्यमान अध्यक्ष अश्रफ घनी हे देशाबाहेर असल्याने राज्यघटनेनुसार मी देशाचा नवा अध्यक्ष असल्याचा दावाही त्यांनी केला. घनी यांच्यासोबत सालेह यांनीदेखील देश सोडल्याची चर्चा होती; पण त्यांनी मात्र याचा इन्कार करत आपण अद्याप पंजशीर भागात असून, येथेच तालिबान्यांविरोधात रणनीती आखली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Road Accidents Reduction : २०३० पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी होणार? ; राज्यसभेत गडकरींनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

Pune Mumbai Expressway Traffic : द्रुतगती मार्गावरील अपघाताचा फटका; पुणे-बंगळूर महामार्गावर अवजड वाहतूक ठप्प

T20 World Cup: इशान किशनच ओपनर! सूर्याचा विश्वास पठ्ठ्याने सार्थ ठरवला, 7 Six अन् फिफ्टी; संजूचे स्थान धोक्यात

Pune Crime : मैत्रिणीला फोन केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला

Jan Arogya Yojana : राज्‍यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्‍य केंद्रातही महात्‍मा फुले योजना; आता बाह्यरुग्ण विभागातील उपचारही मिळतील मोफत

SCROLL FOR NEXT