Mulla Abdul Ghani with Wang Yi Sakal
ग्लोबल

तालिबानी गटाने घेतली वँग यी यांची भेट

तालिबान संघटनेच्या एका गटाने आज चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांची तिआनजीन येथे भेट घेतली.

पीटीआय

बीजिंग - तालिबान संघटनेच्या (Taliban Organisation) एका गटाने आज चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी (Wang Yi) यांची तिआनजीन येथे भेट (Meet) घेतली. मुल्ला अब्दुल घनी बरादर याच्या नेतृत्वाखालील या गटाने, अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर कोणालाही करू दिला जाणार नाही, असे आश्‍वासन चीनला दिले. बरादर याने चीनला ‘विश्‍वासू मित्र’ असेही संबोधले आहे. (Taliban Group Met Wang Yi)

अफगाणिस्तानमधून अमेरिकेची सैन्यमाघारी होत असताना चीन आणि अफगाणिस्तानची जवळीक वाढत आहे. अफगाणिस्तान सरकारमध्ये पुढील काळात तालिबानचे वर्चस्व असणार हे स्पष्ट असून आताही देशातील निम्म्याहून अधिक जिल्हे त्यांच्याच ताब्यात आहेत. या पार्श्वभूमीवर तालिबानी गटाचा हा चीन दौरा झाला आहे. तालिबानच्या अफगाणिस्तानमधील आक्रमक वाटचालीबद्दल चीनला चिंता आहे.

चीनमधील शिनजिआंग प्रांतात उइगर मुस्लिमांमध्ये सरकारबद्दल असंतोष आहे. या समुदायातील ईस्ट तुर्कमेनिस्तान इस्लामिक मूव्हमेंट (ईटीआयएम) फुटीरतावादी गट अफगाणिस्तानला लागून असलेली सीमा ओलांडण्याची शक्यता चीनने व्यक्त केली आहे. मात्र, अफगाणिस्तानच्या भूमीचा इतरांना वापर करू दिला जाणार नाही, असे आश्‍वासन तालिबानने वँग यी यांना दिले आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महंमद कुरेशी यांनी तीन दिवसांपूर्वी वँग यी यांची भेट घेत, अफगाणिस्तानमधील दहशतवाद्यांविरोधात संयुक्त कारवाई करण्याची घोषणा केली होती.

आजच्या भेटीवेळी वँग यी यांनी, तालिबानने ‘ईटीआयएम’पासून दूर रहावे, त्यांना मदत करू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालानुसार, ‘ईटीआयएम’चे शेकडो सदस्य अफगाणिस्तान सीमेवर जमा झाले आहेत. यी यांची मागणी तालिबानने मान्य केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT