ग्लोबल

अफगाणिस्तान : मुलींच्या शिक्षणाबाबत तालिबानचा पहिला फतवा

सकाळ डिजिटल टीम

विद्यापीठातील प्राध्यापक, खासगी संस्थाचालक आणि तालिबानच्या अधिकाऱ्यांची तीन तास बैठक झाल्यानंतर हा फतवा काढण्यात आला.

काबूल - अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानने पहिला फतवा जारी केला आहे. याबाबत खामा न्यूजने म्हटलं आहे की, अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतात तालिबानच्या अधिकाऱ्यांनी सरकारी आणि खासगी विद्यापीठांना आदेश दिला आहे. मुलींना आता मुलांसोबत एकाच वर्गात बसू दिले जाणार नाही.

विद्यापीठातील प्राध्यापक, खासगी संस्थाचालक आणि तालिबानच्या अधिकाऱ्यांची तब्बल तीन तास बैठक झाली. त्यात असं सांगण्यात आलं की,'एकत्र शिक्षण सुरु ठेवण्याचा कोणता पर्याय आणि कारण नाही. ही व्यवस्था संपवली पाहिजे.' अफगाणिस्तानमध्ये एकत्र शिक्षण आणि वेगवेगळ्या वर्गात अशी व्यवस्था आहे. यामध्ये वेगवेगळे वर्ग चालवणाऱ्या शाळा आहेत. तर देशातील सरकारी आणि खासगी विद्यापीठ आणि संस्थांमध्ये एकत्र शिक्षण दिलं जातं.

हेरात प्रांतातील प्राध्यापकांनी म्हटलं की, सरकारी विद्यापीठ आणि संस्था वेगवेगळे वर्ग भरवते. मात्र खासगी संस्थांमध्ये विद्यार्थीनींची संख्या कमी आहे. त्यामुळे वेगवेगळ्या वर्गाची सोय करता येत नाही. अफगाणिस्तान इस्लामिक अमीरातच्या उच्च शिक्षण विभागाचे प्रमुख मुल्ला फरीद यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली. त्यांनी म्हटलं की, एकत्र शिक्षण बंद केलं पाहिजे, कारण हेच समाजातील वाईटाचे मूळ आहे.

महिला प्राध्यापक किंवा वयोवृद्ध पुरुष यांनी विद्यार्थीनींना शिकवाव असा एक पर्यायसुद्धा फरीद यांनी एक पर्याय सुचवला होता. नसेल तर एकत्र शिक्षणाच काही पर्याय किंवा कारण नाही. हेरातमध्ये प्राध्यापकांनी सांगितलं की, खासगी संस्था वेगवेगळ्या वर्गांचा खर्च करू शकत नाहीत. त्यामुळे हजारो मुली उच्च शिक्षणापासून दूर राहू शकतात. हेरात प्रांतात जवळपास 40 हजार विद्यार्थी संख्या आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

Nalasopara News: बर्थडेचा केक खाताच ११ जणांना विषबाधा, केकमध्ये आढळलं...

Marathi News Live Updates : वैद्यकीय एमबीबीएस आणि बीडीएसच्या प्रवेश पहिली यादी २५ ऑगस्ट रोजी जाहीर होणार

ममतांचे निकटवर्तीय आणि विधानसभेच्या माजी उपसभापतींचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत पक्ष कार्यालयातच आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT