narendra modi  file photo
ग्लोबल

PM मोदींच्या वक्तव्यावर तालिबानच्या नेत्याची प्रतिक्रिया; भारताला इशारा

सकाळ डिजिटल टीम

तालिबानचा प्रमुख नेता असलेल्या शहाबुद्दीन दिलावरने मोदींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. दहशतीच्या बळावर स्थापन केलेली सत्ता कायम स्वरुपी नसते असं वक्तव्य मोदींनी केलं होतं.

तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तिथे अराजक माजलं आहे. काबूल विमानतळावर बॉम्बस्फोटात 70 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, आता तालिबानचा प्रमुख नेता असलेल्या शहाबुद्दीन दिलावरने मोदींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. दहशतीच्या बळावर स्थापन केलेली सत्ता कायम स्वरुपी नसते असं वक्तव्य मोदींनी केलं होतं. ते आव्हान म्हणून स्वीकारून सत्ता टिकवून दाखवू असं दिलावरने म्हटलं आहे. तसंच अफगाणिस्तानात योग्य पद्धतीनं सरकार चालवत असल्याचं लवकरच भारताला दिसेल असंही दिलावरने म्हटलं.

पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ मंदिर प्रकल्पांचे उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळी दहशतवादाच्या माध्यमातून सत्ता मिळवण्यावर भाष्य केलं होतं. यात त्यांनी तालिबानचा उल्लेख न करता इशारा दिला होता. यावरूनच तालिबानच्या प्रमुख नेत्यानं रेडिओ पाकिस्तानला दिलेल्या मुलाखतीतून प्रतिक्रिया दिलीय. यात म्हटलंय की, भारतानं अफगाणिस्तानच्या अंतर्गत बाबींमध्ये नाक खुपसू नये. तसंच पाकिस्तान हे मित्रराष्ट्र असून 30 लाखांहून अधिक अफगाण नागरिकांना आश्रय दिला त्याबद्दल त्यांचे आभार. याशिवाय जगातील प्रत्येक देशाशी शांततेचे आणि सामंजस्याचे संबंध ठेवण्याची इच्छाही दिलावरने व्यक्त केली.

जगभरातील अनेक देशांनी अफगाणिस्तानबाबत वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. भारतही याला अपवाद नाही. तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तिथली परिस्थिती गंभीर असल्याचं मत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सर्वपक्षीय बैठकीत व्यक्त केलं. तसंच भारताने सध्या घेतलेल्या भूमिकेला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. सध्या अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना सुखरुप मायदेशी आणणे यालाच प्राधान्य दिले जाईल असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Deshmukh Murder Case: कोण होते पंडित कमलाकर देशमुख, कशी झाली होती हत्या? सोलापूर हादरवणारी Exclusive माहिती

Hasan Mushrif Kagal : हसन मुश्रीफांच्या मनातलं आलं ओठावर, समरजित घाटगेंसोबत मनोमिलन करणाऱ्या अदृश्य शक्तीचं नाव केलं उघड; मंडलिकांवरही म्हणाले...

Credit Card Offer: लाइफटाइम फ्री क्रेडिट कार्ड ऑफर! कमी क्रेडिट स्कोअर असला तरीही चालेल! काय आहे ही नवी ऑफर?

Latest Marathi News Live Update : कृषिमंत्री दत्तामामा भरणे आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर

आजारी पत्नीवर जादूटोणा करण्याचा प्रकार उघड! 'शेतात चाललं होतं भयानक कांड'; संगमनेर तालुक्यातील धक्कादायक घटना समोर..

SCROLL FOR NEXT