ग्लोबल

अफगाणिस्तानात तालिबानराज? राष्ट्रपती अश्रफ घनी राजीनाम्याच्या उंबरठ्यावर

विनायक होगाडे

काबुल: अफगाणिस्तानमधून मोठी बातमी येत आहे. राष्ट्रपती अशरफ घनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या वाढत्या वर्चस्वामुळे अशरफ घनी हे पाऊल उचलण्याची दाट शक्यता आहे. जर त्यांनी राजीनामा दिला तर त्यानंतर आता तालिबान कमांडर मुल्ला अब्दुल घनी बरादर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती बनू शकतील. अफगाणिस्तान सरकारने इस्लामिक दहशतवाद्यांसमोर आत्मसमर्पण केल्यानंतर तालिबान राजवटीत मुल्ला अब्दुल घनी बरदार अफगाणिस्तानचे नवे अध्यक्ष असतील. राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी तालिबानशी चर्चा केल्यानंतर सत्ता सोडण्याची शक्यता आहे. यापूर्वी मुल्ला अब्दुल घनी बरदार यांच्या नेतृत्वाखाली तालिबानच्या शिष्टमंडळाने काबूलमध्ये राष्ट्रपती भवनात प्रवेश केला होता. मात्र, काही रिपोर्ट्सनुसार, अफगाणिस्तानचे माजी गृहमंत्री अली अहमद जलाली हे अफगाणिस्तानमधील नवीन सरकारचे प्रमुख असतील.

अफगाण सैन्याविरोधात महिनाभर चाललेल्या संघर्षानंतर, कट्टर इस्लामी संघटना तालिबानचे दहशतवादी अखेर आज रविवारी काबूलच्या वेशीवर पोहोचले आहेत. तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी एका निवेदनात म्हटलंय की, सत्तांतरणाची प्रक्रिया सुरक्षितपणे पूर्ण व्हावी, यासाठी कोणाच्याही जीवाची, मालमत्तेची हानी न करता, आणि काबुलींच्या जीवनाशी तडजोड न करता वाटाघाटी सुरू आहेत. इस्लामिक अमीरातने आपल्या सर्व सैन्याला काबुलच्या वेशीवर उभे राहण्याच्या सूचना दिल्या आहेत, तसेच, हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंतशहरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करू नये, अशी सूचना दिली आहे. तालिबानने राष्ट्रपती अशरफ घनी यांना रक्तपात टाळण्यासाठी शरण येण्याचे आवाहन केले होते.

तालिबान वाटाघाटी करुन सत्ता हस्तांतरणाच्या तयारीसाठी अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींच्या निवासाकडे जात आहेत. तर राष्ट्रपती अशरफ घनी यांनी सरकारी सुरक्षा दलांना राजधानी काबुलमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले आहे. दूसरीकडे भारत अफगाणिस्तानमधील वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. परिस्थिती पाहून काबूलमधून मुत्सद्दीपणे आपल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याबाबत निर्णय घेण्यासाठी भारत तयार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

याआधी अशी बातमी आली होती की, तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये घुसखोरी केली आहे. गृहमंत्री अब्दुल सत्तार यांचं असं वक्तव्य समोर आलं होतं की, तालिबानकडे सत्ता शांततापूर्वक पद्धतीने सोपवली जाईल. तर दुसरीकडे तालिबानने आपल्या समर्थकांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT