taliban
taliban  sakal media
ग्लोबल

बंद करा गाणी! तालिबानी असल्याचं भासवत भर लग्नात तिघांचा खात्मा

सकाळ डिजिटल टीम

काबूल : अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता स्थापन झाल्यापासून निरानिराळ्या घटना घडत आहेत. तालिबान आपल्या आधीच्या सत्ताकाळात जसा वागला तसाच वागेल की काही सुधारणांचा अंगिकार करेल, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. मात्र, काल शनिवारी अशी एक घटना घडली आहे, जी ऐकता तालिबान आपला मूळ स्वभाव सोडणार नाहीच, असं दिसून येतंय. लग्नात वाजणाऱ्या गाण्याचा आवाज ऐकून तालिबान्यांनी तीन लोकांचा खात्मा केल्याची माहिती मिळत आहे. स्वत: तालिबानी असल्याचं सांगत काहींनी लग्नावर हल्ला करण्याची ही घटना पूर्व अफगाणिस्तानमध्ये ही घटना घडली आहे.

तालिबान सरकारने स्वत:चं या घटनेची माहिती दिली आहे. तालिबान सरकारचे प्रवक्ते झबिहूल्लाह मुजाहिद यांनी म्हटलंय की, त्या तीन हल्लेखोरांपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. त्या तिघांचं हे कृत्य इस्लामिक चळवळीच्या वतीने काम करत असल्याच्या दाव्याचं खंडन करण्यात आलं आहे. थोडक्यात, ही घटना तालिबानने केली नसून तालिबानच्या नावावर कुणीतरी केल्याचा त्यांच्या दावा आहे.

पुढे त्यांनी माहिती देताना म्हटलं की, काल रात्री नांगरहारच्या शम्सपूर मार घुंडी गावात हाजी मलंग जानच्या लग्नात तीन लोक घुसले. त्यांनी स्वतःची ओळख तालिबानी म्हणून करवून दिली. त्यानंतर त्यांनी लग्नामध्ये हस्तक्षेप नोंदवत सुरु असणारं संगीत थांबवायला सांगितलं. त्यानंतर केलेल्या गोळीबारात कमीतकमी तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर बरेच जण जखमी झाले आहेत.

या घटनेतील आरोपीपैंकी तिघांना अटक करण्यात यश आलं असून आणखी एकाचा शोध अद्याप सुरु आहे. या घटनेच्या सूत्रधार आमच्या ताब्यात आहेत. ज्यांनी इस्लामिक अमिरातच्या नावाचा वापर वैयक्तिक भांडणा-तंट्यासाठी केला आहे त्यांना शरीया कायद्यानुसार शिक्षा करण्यात येईल, असंही त्यांनी म्हटलंय.

नांगरहार प्रांतातील तालिबान गव्हर्नरचे प्रवक्ते काझी मुल्ला अदेल यांनी ही घटना घडल्याचं मान्य केलं. परंतु, अधिक तपशीलात माहिती दिली नाही. पीडितांच्या नातेवाइकाने सांगितलंय की, तालिबानने संगीत सुरू असताना गोळीबार केला.

याआधीच्या तालिबानच्या सत्ताकाळात संगीतावर बंदी घालण्यात आली होती. मात्र, नवं सरकार सत्तेत आल्यापासून असा काही फतवा अद्याप जारी करण्यात आलेला नाहीये. मात्र, तरिही तालिबानी नेतृत्व संगीताकडे द्वेषाने पाहत असून अशा मनोरंजनाला इस्लामचे उल्लंघन समजतात. इस्लामिक अमिरातीमध्ये कोणालाही संगीत किंवा कोणत्याही गोष्टीपासून दूर करण्याचा अधिकार नाही, फक्त त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करणे. हाच मुख्य मार्ग आहे, असं मुजाहिदने यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident: त्या रात्री मुलाला.. विशाल अग्रवालने पोलीस कोठडीत दिली मोठी कबूली

Share Market: निफ्टी ऐतिहासिक उच्चांकावर, सेन्सेक्सने केला 75 हजारांचा टप्पा पार, निवडणुकी दरम्यान बाजाराने केला नवा विक्रम

Latest Marathi News Update: सुरेंद्र अग्रवाल यांना गुन्हे शाखेने चौकशीसाठी बालावले

Vasant More: कोथरूडच्या पुढाऱ्यांनी जरा.. तात्यांनी काढला पुण्यातील नाईट लाईफचा कच्चाचिठ्ठा, नेत्यांवर मोठे आरोप

Faf du Plessis : आरसीबीच्या कर्णधाराचा पत्ता होणार कट? नव्या हंगामात नवा गडी शोधणार

SCROLL FOR NEXT