Taliban esakal file photo
ग्लोबल

तालिबान: अमरुल्लाह सालेहनी ट्विट करु नये म्हणून पंजशीरमध्ये केली इंटरनेट बंदी

सकाळ डिजिटल टीम

काबूल: तालिबानने सध्या संपूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे. मात्र, अफगाणिस्तानातील एकमेव प्रांत पंजशीर मात्र त्यांना काबीज करता आलेला नाहीये. याच भागात तालिबानी विरोधकांनी आश्रय घेतला आहे. उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांच्यासोबत अफगाणिस्तानातील बंडखोर कमांडर अहमद शाह मसूद यांचा मुलगा अहमद मसूद सध्या पंजशीरमध्ये आहे. पंजशीर हा प्रांत सध्या तालिबान्यांची डोकेदुखी ठरला आहे.

पंजशीर आपल्या ताब्यात यावा, म्हणून तालिबान आटोकाट प्रयत्नात आहे, मात्र त्यात त्यांना यश मिळत नाहीये. एकीकडे गोळ्या-बंदूकीच्या माध्यमातून ताबा मिळवणाऱ्या तालिबानने आता नवा फंडा आजमावला आहे. तालिबानने पंजशीर खोऱ्यातील इंटरनेटची सेवा बंद केली आहे. याचं मुख्य कारण म्हणजे तालिबानला तगडी फाईट देण्याच्या हालचाली मुख्यत: याच भागात सुरु आहेत. माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांना त्यांचं म्हणणं ट्विटरद्वारे मांडता येऊ नये म्हणून जाणीवपूर्क तालिबानने हे पाऊल उचललं आहे.

अमरुल्लाह सालेह हे अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांनी स्वत:ला राष्ट्राध्यक्ष घोषित करुन तालिबानच्या विरोधात युद्ध पुकारलं आहे. ते सध्या पंजशीरमध्ये आहेत. तालिबानने अलिकडेच दावा केला होता की, त्यांनी पंजशीरमध्ये घुसखोरी केली आहे. मात्र पंजशीरने याचं खंडन केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT