ग्लोबल

तालिबानी मास्टरकडून चांगले शिकलेत; स्फोटानंतर काळजीवाहू राष्ट्रपतींचे ट्विट

सकाळ डिजिटल टीम

तालिबानला याची किंमत मोजावी लागेल आणि आम्ही तुम्हाला शोधून मारू असंही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी म्हटलं आहे.

काबुल विमानतळावर गुरुवारी आत्मघाती हल्ला झाला. यामध्ये 70 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून यात अमेरिकेच्या 12 सैनिकांचा समावेश आहे. इस्लामिक स्टेट खुरासान प्रांतने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. आत्मघाती हल्ल्यात आपला हात असल्याचे सांगताना त्यांनी हल्लेखोराचा फोटोही जारी केला आहे. IS ने असा दावा केला की, हल्ल्यात 160 अमेरिकन सैनिक आणि त्यांचे सहकारी मारले गेले. तसंच अनेकजण जखमी झाले आहेत. दरम्यान, या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानचे काळजीवाहून राष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी एक ट्विट केलं आहे. यामध्ये तालिबानींनी त्यांच्या मास्टरकडून चांगले शिक्षण घेतले आहे असं म्हटलं आहे.

अमरुल्ला सालेह म्हणाले की, तालिबानी मास्टरकडून चांगले शिकलेत. पाकिस्तानचे क्वेट्टा शुरावेळी असलेले संबंध फेटाळले तसे तालिबानने आता इसिसशी संबंध नाकारले आहेत. हातात असलेला प्रत्येक पुरावा हा IS-K ची पाळेमुळे ही तालिबान आणि हक्कानी नेटवर्कमध्ये असल्याचं दाखवतं.

अमरुल्ला सालेह यांनी याआधी तालिबानला विरोध सुरुच राहणार असल्याचं म्हटलं होतं. अफगाणिस्तानचे सरकार म्हणून तालिबानला कधीच मान्यता देणार नाही. अहमद मसूद यांच्या नेतृत्वाखाली इतर बाबींवर चर्चेसाठी तयार आहे. मात्र शरणागती पत्करणार नाही असेही त्यांनी सांगितलं होतं.

अमेरिकेने त्यांच्या सैनिकांचा या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर तालिबानला इशारा दिला आहे. तालिबानला याची किंमत मोजावी लागेल आणि आम्ही तुम्हाला शोधून मारू असंही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी म्हटलं आहे. अफगाणिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली असून 30 ऑगस्टपर्यंत अमेरिकेचा झेंडा अर्ध्यावर फडकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT