दार इस सलाम- टांझानियामध्ये चेंगराचेंगरीची भीषण घटना घडली होती. आपल्या राष्ट्रपतीच्या मृत्यूनंतर त्यांना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 45 लोकांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले आहेत. टांझानियाचे अध्यक्ष जॉन मॅगफुली यांचा 17 मार्चला अचानक मृत्यू झाला होता. त्यांच्या अचानकरीत्या जाण्याने देशातील नागरिकांना मोठा धक्का बसला. 21 मार्चला त्यांचे पार्थिव दार इस सलाम शहरामध्ये आणण्यात आले होते. यावेळी त्यांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक जमा झाले होते. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंरीत 45 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिलीये. जॉन मॅगफुली यांचे पार्थिव दार इस सलाम शहरातील स्टेडियममध्ये ठेवण्यात आले होते. त्यावेळी हजारोंच्या संख्येने लोकांनी स्टेडियमकडे धाव घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, स्टेडियमची Uhuru Stadium क्षमता मर्यादीत होती आणि हजारोंच्या संख्येने लोक स्टेडियम बाहेर जमा झाले होते. लोकांनी यावेळी संयम न दाखवता, स्टेडियममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी होती. पण, त्या तुलनेत लोकांची संख्या मोठी होती. लोकांनी सर्व अडथळे तोडत स्टेडियममध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्यानंतर चेंगराचेंगरीची घटना घडली. यामध्ये 45 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती टांझानियन पोलिसांनी दिली आहे. तसेच अनेकजण जखमी झाल्याचे सांगण्यात आलंय.
सुरुवातीला मृतांचा आकडा जाहीर करण्यात आला नव्हता. चेंगराचेंगरित महिला आणि लहान मुलांचाही समावेश असल्याचं सांगण्यात आलंय. शिवाय अनेकांवर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. जॉन मॅगफुली यांचे पार्थिव शहरातील अनेक भागातून फिरवून शेवटी दार इस सलामच्या Uhuru स्टेडियममध्ये आणण्यात आले होते. शेवटी 26 मार्चला त्यांचे अंत्यसंस्कार त्यांच्या मूळ गावी करण्यात आले.
60 वर्षांच्या मॅगफुली यांचा मृत्यू हृदयासंबंधी आजाराने झाल्याचं सांगितलं जातंय, पण त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. त्यांच्या मृत्यूनंतर समीया सुलूहू हसन Samia Suluhu Hassan यांनी देशाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे. मॅगफुली यांनी देशात भ्रष्टाचारविरोधी लढा चालवता होता. कोरोना काळात त्यांनी रुग्णांची आकडेवारी जाहीर न करण्याचा निर्णय घेतला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.