ग्लोबल

शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत ठेवले शरीरसंबंध, म्हणते वर्गात मुलंच फ्लर्ट करतात

हे प्रकरण कोर्टात पोहोचले, तेव्हा फतिनाह होसैनीने गर्भवती असल्याचाही दावा केला होता.

दीनानाथ परब

लंडन: विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडवण्याची, त्यांना चांगला मार्ग दाखवण्याची जबाबदारी शिक्षकांवर (Teacher) असते. पण अनेकदा शिक्षकांना आपल्या या जबाबदारीचा विसर पडतो, आणि त्यांच्याकडूनच शिक्षक-विद्यार्थी नात्याला कलंक लावणाऱ्या लाजिरवाण्या चूका घडतात. इंग्लंडच्या (england) वेस्ट ससेक्सच्या शाळेत शिकवणाऱ्या एका शिक्षिकेने, तर आपल्या सर्व मर्यांदाचे उल्लंघन करुन विद्यार्थ्यासोबतच शरीरसंबंध प्रस्थापित केले.

फतिनाह होसैन असे या शिक्षिकेचे नाव आहे. फतिनाहने वर्गातील एका विद्यार्थ्यासोबत शरीरसंबंध ठेवले व मुलचं वर्गात माझ्यासोबत फ्लर्ट करतात असे बेधडकपणे सांगून टाकले. एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलासोबत शरीरसंबंध ठेवल्याप्रकरणी मागच्या आठवड्यात फतिनाह तुरुंगात होती. एका विद्यार्थ्याने अनेक महिन्यांपासून तिच्यासोबत असलेले अनैतिक संबंध तोडण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण कोर्टात पोहोचले, तेव्हा फतिनाह होसैनीने गर्भवती असल्याचाही दावा केला होता. 'मिरर' वेबसाइटने हे वृत्त दिलं आहे.

मुलाने तिच्यावर केलेले आरोप मागे घ्यावेत, यासाठी तिने पैसेही देऊ केले होते. जून महिन्यात जामिनावर बाहेर आल्यानंतर फतिनाह होसैनीने त्या विद्यार्थ्याने आणि त्याच्या कुटुंबाने आपली छळवणूक केली, असे सांगत मोहिम सुरु केली होती. पोलीस चौकशी थांबवण्यासाठी ती हे सर्व करत होती.

आपल्या या कृत्यांबद्दल अन्य मुलांनी तोंड उघडू नये, यासाठी तिने अन्य विद्यार्थ्यांना धमकावलं होतं. फतिनाह होसैनी सध्या जामिनावर बाहेर असून या प्रकरणाचा खटला न्यायालयात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Tourism Latest Update : गणपतीपुळे बीच अखेर पर्यटकांसाठी खुला! 2 महिन्यांनंतर बंदी उठवली; पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण

थकलेला चेहरा, चालताही येईना... नवऱ्याला अखेरचा निरोप देताना अरुणा इराणी यांना अश्रू अनावर; या कलाकारांचीही हजेरी

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Latest Marathi News Live Update : करमाडमध्ये टोमॅटो दरावरून शेतकऱ्यांचा उद्रेक

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

SCROLL FOR NEXT